श्री विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेंबळे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
संस्थेचे उपाध्यक्ष नागेश मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
बेंबळे। प्रतिनिधी।
भारताचा 75 वा स्वातंत्र दिन म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव श्री विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बेंबळे येथे उत्साहात साजरा केला. संस्थेचे उपाध्यक्ष नागेश मस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण फडकविण्यात आला
तर प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक सचिव गोविंद भोसले,सरपंच विजय पवार,शंकर पवार,वाय जी भोसले सोसायटी चेअरमन सदाशिव भोसले, सर्कल गंगासागर सोनवणे, माणिक पाटील हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीं गावातून लेझीम पथक साजरे करून गावातील लोकांमधे अनंदउत्साह द्विगुणित केला.जय जवान जय किसान,भारत माता कि जय अशा घोषणा देऊन विमलेश्वर नगरी दुमदुमली होती.तसेच विद्यार्थ्यांनी स्वतंत्र संग्रामात भाग घेतलेल्या अनेक थोर नेत्यांचा भाषणातून गौरव केला.
संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बागवाले,गोविंद भोसले, विजय पवार, तात्यासाहेब पवार,सदाशिव भोसले,शंकर पवार,वाय जी भोसले,नागेश मस्के माणिक पाटील गंगासागर सोनवणे, समस्त ग्रामस्थ, विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन पोलीस पाटील बिभिषण कीर्ते यांनी केले तर प्रस्तावित बबन भोसले यांनी केले आभार प्रदर्शन लक्ष्मण भोसले यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा