*शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला अमृत महोत्सवी सोहळा*
आज दिनांक - १५ ऑगस्ट २०२२ रोजी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवरत्न शिक्षण संस्थेचे संचालक श्री एस एम शिंदे सर आणि अध्यक्ष म्हणून LMC मेंबर श्री एच डी भोसले सर त्याचप्रमाणे श्री शिवदत्त नारायणकर सर आणि श्री शंकर गायकवाड सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत आणि ध्वजगीत म्हणून ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्रशालेतील शिक्षक श्री रणजीत माने देशमुख सरांनी अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांची निवड केली आणि त्याला श्री अभिषेक काटकर सरांनी अनुमोदन दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र माने देशमुख सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये समूहनृत्य, गीत गायन, वैयक्तिक नृत्य, लाटी काठी आणि विद्यार्थी भाषणे असे विविध प्रकार घेण्यात आले. त्यामध्ये लाठी काठी या प्रकारांमध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थी शौर्य उपासे याने उत्कृष्ट असे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांची दाद मिळविली तसेच संस्कृती खाडे या तिसरीतील विद्यार्थिनीने हे मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत सादर केले विद्यार्थ्यांच्या भाषणामध्ये रेयांश वाघ, गायत्री आडगळे, प्रयाग ढगे, रुद्र झंजे, उत्कर्ष भांगे, स्वरा कांबळे,शिवशंकर राजमाने, माही बागल ,कीर्ती साठे, ध्रुव कांबळे ,राजलक्ष्मी सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिक्षिका सौ शिल्पा जाधव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांचे मनोगत झाले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका अजरीन मुजावर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ तमन्ना नाईकवाडी मॅडम यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा