*"विदर्भ कोकण ग्रामीण बँक, करमाळा शाखेने केले पाच महिन्यात ८ कोटी ५४ लाख रुपयाचे कर्ज वाटप"*
*शेतकऱ्यांना दिलासा*
करमाळा प्रतिनिधि
एकीकडे राष्ट्रीयीकृत बँकाकडून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची फरफट होत आहे. तर दुसरीकडे करमाळा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने अवघ्या पाच महिन्यात शेतकऱ्यांना ६ कोटी ५४ लाख पिक कर्जाचे वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. वेळेवर पिक कर्ज मिळाल्यामुळे शेतकरी सुद्धा समाधान व्यक्त करीत आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या करमाळा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १ एप्रिल २०२२ ते २९ ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यात ६ दत्तक गावातील शेतकऱ्यांना बँक व्यवस्थापक शरद सु. सावंत व सहायक व्यवस्थापक शिवम ग. बारहाते यांच्या आदेशानुसार बँक मित्र व बँक सखी यांच्या माध्यमातून पिक कर्ज धारकांना ६ कोटी ५४ लाख रुपयाचे वाटप करून एक आदर्श निर्माण केला आहे. पिक कर्ज वाटपात तालुक्यात बहुदा ही शाखा प्रथम क्रमांकावर असावी.
शासनाने पिक कर्ज वाटप करण्यासाठी राज्यातील बँकांना निर्देश दिले होते. मात्र काही बँकेत शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे भिक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली होती. परंतु विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या करमाळा शाखेने आपल्या दत्तक ६ गावातील पिक कर्जासाठी पात्र लाभार्थ्यांना ६ कोटी ५४ लाख रुपयांचे वाटप अवघ्या पाच महिन्यात केले आहे.
तसेच १५ बचत गटांना ३३ लाख रु.,दुचाकी व चारचाकी वाहन कर्ज ३६ लाख रु. , शैक्षणिक कर्ज,सोने तारण कर्ज,मुद्रा कर्ज असे २ कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. शाखेने अवघ्या पाच महिन्यात एकुण ८ कोटी ५४ लाख रुपयाचे कर्ज वाटप करून विदर्भ कोकण ग्रामीण बँक, करमाळा शाखेने एक विक्रम केला आहे.
या शाखेला तालुक्यातील ६ गावे जोडण्यात आली आहेत. जास्तीत जास्त खातेदारांना दिलासा मिळावा, त्या अनुषंगाने शाखा व्यवस्थापक शरद सु.सावंत, सहायक व्यवस्थापक शिवम ग. बारहाते, कॅशियर रेखा स.थोरे, बँक मित्र व बँक सखी हे पूर्णपणे कर्तव्यदक्षपणे काम करत आहेत.
शाखा व्यवस्थापक खातेदारांना वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, गृह कर्ज, मालवाहतूक वाहन कर्ज, व्यवसाय वृध्दी साठी कर्ज अश्या अनेक इत्यादी कर्जांचा तसेच मुदत ठेवीवर १ वर्ष ते २ वर्ष - ५.७५% , २ वर्ष ते १० वर्ष - ६.२५% व जेष्ठ नागरिक ०.५०% जास्त व्याज असल्याने या संधीचा लाभ घेण्याचे खातेदारांना आवाहन करत आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँक,करमाळा शाखा खातेदाराच्या हिताची असल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकरी तसेच बँक खातेदार देत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा