Breaking

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत नेतृत्वाखाली तालुक्यातील रखडलेले प्रश्न सोडवा!!किरण तात्या सावंत!!!


सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत नेतृत्वाखाली तालुक्यातील रखडलेले प्रश्न सोडवा!!
किरण तात्या सावंत!!!



करमाळा( प्रतिनिधी)

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत हे एक धाडसी व सक्षम नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व रखडलेले प्रकल्प रेंगाळलेले प्रश्न सोडविण्यासाठी नूतन जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पुढाकार घ्यावा असे मत भैरवनाथ शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांनी व्यक्त केले

शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर भैरवनाथ कारखान्याच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश  चिवटे यांचा सत्कार किरण तात्या सावंत यांनी कारखाना स्थळावर केला

यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर रविराज भोसले शेतकी अधिकारी  प्रसन्न कांबळे वसुली अधिकारी बबन काका चांदगुडे हार्वेस्टर इन्चार्ज शंकर कुडाळ  लेबर ऑफिसर जितेंद्र चांदगुडे एबीपी मॅनेजर सिद्धेश्वर मस्कर  कृषी विकास अधिकारी गायकवाड आणि जाधव पुरवठा अधिकारी चव्हाण  चीफ केमिस्ट जाधव भगवान सानप सिद्धेश्वर मस्कर  सुपरवायझर पप्पू नाना सूर्यवंशी शिवसेनेचे नेते अनिल पाटील विनोद महानवर आधी सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते

यावेळी बोलताना किरण तात्या सावंत म्हणाले की भैरवनाथ कारखान्याच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मदत झाली आहे येणाऱ्या काळात सुद्धा सात लाख गाळपाची नियोजन आहे

महेश चिवटे यांच्या रूपाने  एक आक्रमक नेतृत्व सोलापूर शिवसेनेला मिळाले असून प्राध्यापक तानाजीराव सावंत व शिवसेना नेते शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तालुक्यातील जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावेत असे मत व्यक्त केले

यावेळी सत्काराला उत्तर देताना महेश चिवटे

म्हणाले की सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत प्राध्यापक शिवाजीराव सावंत आमदार नारायण आबा पाटील यांनी जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम करू असे स्पष्ट केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा