Breaking

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२

महामार्गामुळे घरा मध्ये शिरते पाणी,त्वरित भरपाई अन्यथा आमरण उपोषण


महामार्गामुळे घरा मध्ये शिरते पाणी,त्वरित भरपाई अन्यथा आमरण उपोषण


श्रीगोंदा-नितीन रोही,

सविस्तर असे की मंगळवार दि. १३/०९/२०२२ रोजी श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील नुकत्याच झालेल्या एन. एच. ५४८ क्र. डी या महामार्गालगतच्या शेंडगेवाडी काष्टी रोड परिसरामध्ये महामार्गाच्या दोन्ही बाजूने गटार लाईन केलेली नसल्याने रस्त्यावर पावसाचे जमा झालेले पाणी घरामध्ये घुसत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल होत असून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. असलेबाबत महसूल, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास निवेदन देवून तातडीने कारवाई करण्याबाबत परिसरातील नागरिकांच्या सह्याचे निवेदन यापूर्वी दोन वेळा देवूनही योग्य ती कारवाई झाली नाही.

सध्या वारंवार होणाऱ्या पावसामुळे घरामध्ये राहणे धोकादायक बनले असून सोमवार दि. २६ रोजी झालेल्या मोठ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घरामध्ये शिरले आहे. तसेच जनावरांना लम्पीसारख्या रोगांनी ग्रासले असून यातून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तरी या नागरिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे तातडीने नुकसानभरपाई मिळावी. आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात तसेच भविष्यात पाणी जाणार नाही याबाबत तातडीने योग्य ती कारवाई होण्याच्या मागणीसाठी शेंडगेवाडी परिसरातील नागरिक दि. ०३/१०/२०२२ रोजी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे  आमदार-रोहितदादा पवार,तहसीलदार,मुख्याधिकारी न. पा, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा,यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

फोटो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा