Breaking

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

चव्हाणवाडी (टें) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नवनाथ शिंदे.




चव्हाणवाडी (टें) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नवनाथ शिंदे.


भिमानगर प्रतिनिधी

चव्हाणवाडी(टें) ता माढा ग्रामपंचायत मध्ये कै. रघुनाथ चव्हाण पार्टी व माजी सरपंच अशोक मिस्किन या पारंपारिक विरोधात असलेल्या दोन पार्ट्या एक झाल्या होत्या त्यामुळे दोन्हीही पार्टीचा सरपंच पदाचा फॉर्मुला ठरलेला होता त्याप्रमाणे प्रथम सरपंच असलेले सरपंच सुनील मिस्किन यांचा कार्यकाल संपल्यानंतर ठरल्याप्रमाणे नवनाथ शिंदे यांची एक मताने निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनीषा लकडे व स्वप्नील सोनटक्के ग्रामसेवक संजय साळुंखे यांनी काम पाहिले


       यावेळी नूतन सरपंच नवनाथ शिंदे यांचा सत्कार मा सरपंच सुनील मिस्किन यांनी हार फेटा शाल श्रीफळ देऊन केला यावेळी आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे आजी-माजी संचालक यांचाही मानसन्मान करण्यात आला. या निवडी वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे  संजय भानवसे व गणेश कुलकर्णी यांनी आपले कर्तव्य बजावले निवडी वेळी चव्हाणवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचाही शाल श्रीफळ फेटा देऊन सन्मान करण्यात आला निवड जाहीर झाल्यानंतर चव्हाणवाडीतील ग्रामस्थांनी फटाक्यांची आतसबाजी करत व गुलालाची मुक्तपणे उधळण करीत जल्लोष साजरा केला.
     यावेळी उपस्थित पार्टी प्रमुख अशोक मिस्किन,  पार्टी प्रमुख अरुणबापू चव्हाण, रा. काँ. माढा तालुका उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण, चव्हाणवाडी सोसायटीचे चेअरमन कैलास चव्हाण, रा. यु. काँ. माढा ता. उपाध्यक्ष संजय मिस्कीन, सोसायटीचे माजी चेअरमन नरहरी नांगरे, अॅड  सचिन चव्हाण, माजी सरपंच सुनील मिस्कीन, उपसरपंच साळूबाई मोठे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती चव्हाण, स्मिता नांगरे, सिंधूताई सलगर, ज्योती इंदलकर, व शिवशंकर हॉटेलचे मालक बाळासाहेब चव्हाण, अर्जुन सलगर, संतोष जाधव, सौदागर भोसले, सौदागर नांगरे, सुभाष चव्हाण, सुनील भोसले, मुंबई पोलीस चंद्रकांत रोडे, विजय रोडे, बापू चव्हाण, रमेश नांगरे, महावीर नांगरे, श्रीमंत इंदलकर, अनिल नांगरे, व्हा चेअरमन अंकुश सलगर, तानाजी चव्हाण, टायगर ग्रुप चे अमीर काजी, वंचित बहुजन चे शरीफ काजी, युवा नेते संग्राम चव्हाण, भाऊसाहेब इंदलकर, आसिफ काजी, विठ्ठल इंदलकर,  मनोज नांगरे, श्याम नांगरे, ज्योतीराम भोसले, देविदास भोसले, अशोक भोसले, विनोद नांगरे, अमोल भोसले, विशाल भोसले, अतुल भोसले, समाधान शिंदे, संतोष भोसले, विजय शिंदे, सुधीर नांगरे, दत्तात्रय गायकवाड, शशिकांत नांगरे, मंगेश इंदलकर, बाळासाहेब नांगरे व चव्हाणवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा