Breaking

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांना दिवाळी सणासाठी सवलतीच्या दराने घर पोहोच साखर वाटप सुरु.*- व्हाईस चेअरमन - वामनभाऊ ऊबाळे


**विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांना दिवाळी सणासाठी सवलतीच्या दराने घर पोहोच साखर वाटप सुरु.*- व्हाईस चेअरमन - वामनभाऊ ऊबाळे


 बेंबळे।प्रतिनिधी।         
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून सालाबाद प्रमाणे दरवर्षी दिपावली या  सणासाठी सभासद, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येते यावर्षीही 1 सप्टेंबर,2022 पासून सवलतीच्या दराने साखर वाटप सुरु करण्यात आली असल्याची माहिती कारख्यान्याचे व्हाईस चेअरमन वामनभाऊ ऊबाळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहीती देताना ते म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत आदरणीय संस्थापक-चेअरमन आ. बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दरवर्षी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रती सभासद 50 किलो साखर सवलतीच्या दराने घरपोहोच वाटप करण्यात येते. या ही वर्षी सन 2022 च्या दिवाळी सणासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना 50 किलो साखर सवलतीच्या दराने वाटप करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतलेला आहे. त्याप्रमाणे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सभासद,ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रती सभासद 50 किलो साखर घरपोहोच वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. साखर वाटपाचा शुभारंभ म्हैस गाव येथून करण्यात आला. सभासद शेतकऱ्यांना घरपोहोच साखर वाटप  करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना एकमेव कारखाना आहे अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनभाऊ उबाळे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा