*धावपळीच्या युगात आपल्या फिटनेस कडे लक्ष देण्याची गरज पोलीस निरीक्षक - सुरेश निंबाळकर*
टेंभुर्णी (प्रतिनिधी:-) सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक जण आपल्या व्यवसायात व्यस्त झाला असून प्रत्येकाने आपला व्यवसाय व कामे बघता बघता प्रत्येकाने आपल्या फिटनेस कडे लक्ष देणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने दैनिक एकमत चे पत्रकार गणेश चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना म्हणाले की सध्या प्रत्येक जण व्यवसाय बघत सोशल मीडिया वरती हिरावून गेला आहे त्यामुळे प्रत्येकाचा जनसंपर्क प्रत्यक्षात कमी झाला असून तो फक्त सोशल मीडियावर होत आहे तसेच आपल्या आरोग्यकडे जर आपले दुर्लक्ष झाले तर येणाऱ्या काळात प्रत्येकाला आरोग्य विषयी अडचणी येणार असून त्या अगोदरच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊन दररोज जीवनातला थोडा वेळ देऊन फिटनेस तंदुरुस्त ठेवण्याची काळाची गरज आहे
यावेळी टेंभुर्णी येथील युवा नेते व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख यांनी बोलताना सांगितले की टेंभुर्णी येथील पत्रकारांनी अनेक दिवसापासून सर्वसामान्यांना न्याय द्यायचे काम केले आहे परंतु स्वतःचा वाढदिवस करण्यासाठी त्यांना वेळ नसतो अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाढदिवस साजरा करणे हे गरजेचे आहे गणेश चौगुले हे खडतर प्रवास करून अनेक अडचणीला तोंड देत पत्रकार झाले आहेत
अशीच टेंभुर्णी शहरात सर्व पत्रकाराची एकत्र राहून येणाऱ्या काळात सर्वसामान्यांना न्याय पत्रकाराकडून मिळावा हीच अपेक्षा करतो अशा शब्दात त्यांनी वाढदिवसानिमित्त उत्तर दिले
यावेळी टेंभुर्णी प्रेस क्लबचे सदस्य सचिन होदाडे यांनी प्रस्ताविकांमध्ये त्यांनी सांगितले की आम्ही सर्वसामान्याला टेंभुर्णी प्रेस क्लबच्या माध्यमातून एकत्र येऊन गेल्या दहा वर्षापासून काम करीत आहे तसेच गणेश चौगुले हे माझे वर्ग मित्र असून त्यांनी अनेक अडचणीला तोंड देत समस्या सोडवले आहेत
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी ओंबासे, माढा तालुका शिवसेनाप्रमुख मधुकर देशमुख, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जयवंत पोळ, प्रहार औद्योगिक महाराष्ट्र अध्यक्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, सोलापूर जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष रोहित खंडागळे, जिल्हा युवक उपाध्यक्ष दादा मिसाळ,डॉ. दादासाहेब माने,
टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य गणेश केचे, शैलेश ओहोळ, प्रशांत देशमुख, गणेश कोरडे, सागर शिरसागर, दीपक काळे, संभाजी ब्रिगेडचे सचिन पराडे, महाराष्ट्र पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू बिचकुले, टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल जगताप, उपाध्यक्ष सतीश चांदगुडे, सचिव सुरज देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सदाशिव पवार, संतोष पाटील, सुहास साळुंखे, सोपान ढगे, सचिन होदाडे, सतीश काळे, आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरज देशमुख यांनी मानले
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा