Breaking

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

मुलींसाठी कौशल्य विकास रोजगार मेळावा हा स्तुत्य उपक्रम -खा.हेमंत पाटील



मुलींसाठी कौशल्य विकास  रोजगार मेळावा हा स्तुत्य उपक्रम -खा.हेमंत पाटील


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड : मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थिनींना कौशल्य शिक्षणाच्या बळावर नौकरी करण्याची आपलं कसब दाखविण्याची उज्ज्वल संधी निर्माण व्हावी या उद्देशाने सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट व सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय नांदेड व सहायक आयुक्त कौशल्य विकास कार्यालय व टाटा इलेक्ट्रॉनिक प्रा. लि.होसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यशवंत  महाविद्यालय नांदेड यांच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यातील SC/ST/VJNT/NT/OBC/SBC आणि इतर मागासप्रवर्गातील मुलींसाठी   " ज्यूनिअर टेक्निशियन " या पदावर नौकरीची संधी प्राप्त करून देण्यासाठी येथील यशवंत महाविद्यालयात  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . 
या मेळाव्याला हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन माहिती  घेतली आणि उपस्थित विद्यार्थिनीसोबत संवाद साधला. मुलींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून खऱ्या अर्थाने शासनाने मुलींना त्यांचे उज्वल भविष्य घडविण्याची संधीच निर्माण करून दिली असून असे मेळावे सातत्याने झाले पाहिजेत जेणे करून आपण घेत असलेल्या शिक्षणाचे चीज झाल्याची भावना आजच्या तरुण पिढीत रुजली जाईल.असेही खा. हेमंत पाटील म्हणाले.
 
किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच. पुजार यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या आणि सर्व सहभागी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली.

यावेळी खासदार हेमंत पाटील गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्यासह,मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने , टाटा इलेक्ट्रॉनिक प्रा. लि.होसूरच्या ऐश्वर्या मॅडम, सहायक समाजकल्याण आयुक्त तेजस माळवदकर,यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे ,कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तुम्मलवार यांच्यासह आदी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा