नियोजनपूर्वक काम करा दर्जा बाबत तडजोड करू नका -रणजितसिंह शिंदे
आमदार फंडा मधून वेळापूरकर माठाचे जीर्णोद्धाराचे काम चालू
टेंभुर्णी (प्रतिनिधी)नियोजनपूर्वक काम करा दर्जा बाबत तडजोड करू नका तसेच ही वास्तू टिळक रोड व परिसरातील नागरिकांच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी उपयोगी पडणार असून याचे काम नियोजनपूर्वक करा तसेच कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तोडजोड करू नका कार्यकर्त्यांनी सदर कामाबाबत दक्ष राहून काम कसे व्यवस्थित पार पडेल याकडे लक्ष द्या तसेच गावच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी कायम सजग राहिले आगामी काळात टेंभुर्णी नगर पंचायत होणार आहे. गावातील वेशी जवळील ओढण्याचे सुशोभीकरण करण्यात यावे त्यासाठी योग्य ती मदत करू असे सांगितले
कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सजग राहून कार्य केले पाहिजे तरच गावाचा खऱ्या अर्थाने विकास होईल असे प्रतिपादन त्यांनी वेळापूर मठ या वस्तूच्या पायाभरणी समारंभाच्या वेळेस बोलताना केले. टेंभुर्णी येथे दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. टिळक रोड येथे सदर समारंभ संपन्न झाला. आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते सदर कामाची भूमिपूजन झाले होते त्यावेळी आमदार साहेबांनी आमदार फंडातून सदर माठा साठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे 13 लाख 50 हजार रुपये चा आमदार निधी मंजूर झाला व निविदा प्रक्रिया होऊन कामाची प्रत्यक्ष सुरुवात व पायाभरणी रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वेळापूर मठाचे मठाधिपती श्री गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामी हे ही उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तथा पत्रकार सचिन होदाडे यांनी केले त्यामध्ये त्यांनी सदर कामाचे स्वरूप व होणारे वास्तु याचे नियोजन व आमदार साहेबांनी केलेल्या भरघोस मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी शिवाजीराव पाटील सरपंच प्रमोद कुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आशीर्वाद पर बोलताना केलेल्या मदती बद्दल आमदार साहेबांचे आभार मानले तसेच वेळापूरकर मठा मध्ये सर्वधर्मसमभाव राखला जातो लिंगायत धर्म या सर्वधर्मसमभाव चा पुरस्कर्ता असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख , तालुका पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे, उपसरपंच धनंजय गोंदिल, संतोष तांबे ,अँड.संतोष कानडे, जयवंत पोळ ,परमेश्वर खरात श्रीकांत लोंढे, अनिल तोडकर, मयूर काळे, रामभाऊ शिंदे, माढा नगर परिषदेचे नगरसेवक राजाभाऊ गोटे रोहन देशमुख, विलास देशमुख सोमनाथ साळुंखे अमोल डोईफोडे हे प्रमुख उपस्थित होते तर लिंगायत समाजातील व टिळक रोड येथील पांडुरंग कानडे ,साहिल ताबे ,गणेश स्वामी, सुधीर कथले महादेव क्षीरसागर ,प्रवीण स्वामी,डॉ पावले, मदन शहा, औदुंबर भोसले, अण्णा शिवपुजे,राहुल स्वामी, गणेश भोज, अमोल ताबे,सोमनाथ ताबे,
महादेव स्वामी ,बाळासाहेब भोज , संजय होदाडे, सतीश होदाडे ,रमेश कथले, नंदकुमार कथले,शुभम कानडे बबन शिंदे व मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मुळे यांनी केले तर आभार अॅड.संतोष कानडे यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा