*टेंभुर्णी -सुर्ली रस्त्यावर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मोटारसायकल वरील शिराळ (टें) येथील दोन गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन शाळकरी मुलांचा उपचारास घेऊन जात असताना मृत्यू*
टेंभुर्णी : - सुर्ली (ता.माढा) गावच्या शिवारात अज्ञात वाहनाने ठोकरल्याने मोटारसायकल वरील शिराळ (टें) येथील दोन गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन शाळकरी मुलांचा उपचारास घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री घडली आहे.दोन्ही मुलाच्या अपघाती निधनाच्या घटनेने शिराळ व सुर्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेची अधिक माहिती अशी की,शुक्रवारी रात्री ७.०० वाजण्याच्या सुमारास शिराळ (टें) येथील विठ्ठल अतुल कदम (वय-१६ वर्ष) व रणजित अतुल कदम (वय-१४ वर्ष) हे दोघे सुर्ली येथे दळण घेऊन दुचाकीवरून (क्र-एम.एच-४५-एएस-६०१३) गेले होते.ते दळण घेऊन परतत असताना त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.यामध्ये दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले होते.अपघाताची माहिती मिळताच शेजारील तरुणांनी त्यांना टेंभुर्णी येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकलूज येथे हलविण्यात आले होते.दरम्यान अकलूजकडे जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले होते.
*अपघात एवढा भीषण होता की,ट्रॅक्टरच्या धडकेने दोघेही दुचाकीसह दूरवर रस्त्याच्या खाली फेकले गेले होते.
या अपघाताचा अधिक तपास पोनि सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संदेश चंदनशिव हे करीत आहेत.
*विठ्ठल कदम (वय-१६) हा दहावी पास झाला होता.त्याने सोलापुर येथे आयटीआय ला प्रवेश घेतला होता.तो शुक्रवारीच घरी आला होता.तर रणजित कदम हा अकोले-खुर्द येथील बबनराव शिंदे विद्यालयात नववीत शिकत होता.
*बारा-तेरा वर्षांपूर्वी मयत दोघांचे वडील अतुल कदम यांचा ही अकोले खुर्द जवळ अपघाती मृत्यू झाला होता.पती निधनानंतर त्यांच्या आईने मोठ्या हिमतीने मोल मजुरी करून दोन्ही मुलांचा सांभाळ केला होता.कुटुंबात हे तिघेच एकमेकांचे आधार होते.मोठा मुलगा विठ्ठल हा आयटीआय करून झटपट काम मिळविण्याच्या प्रयत्नात होता.त्याला त्याच्या आईचे कष्ट कमी करावयाचे होते.मात्र या अपघाताने त्यांच्या स्वप्नांचा करूण शेवट झाला आहे.तर या दुर्दैवी अपघातात पोटच्या दोन्ही गोळ्यांचा असा अचानक मृत्यू झाल्याने मातेवर मोठा आघात झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा