*संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील महाळुंग येथील भुयारी मार्गाची उंची वाढवण्यास नितीन गडकरी यांच्याकडून मान्यता*
अकलूज : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील कि.मी 118 मधील भुयारी मार्गाची उंची वाढवण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबई दौऱ्यावर असताना आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या विविध कामाबाबत निवेदन दिले होते.
सदरच्या निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील महाळुंग बायपास येथील कि.मी 118 मधील भुयारी मार्ग हा चार मीटर ऐवजी पाच मीटर करण्यास मान्यता दिली आहे.
महाळुंग येथील पुलाची उंची वाढवण्यास मान्यता मिळाल्याच्या बातमीनंतर महाळुंग परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच केंद्रीय रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे आभार मानले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा