राष्ट्रीय स्तरावर स्मार्ट इंडिया अंतर्गत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पिलीवच्या सुनयना वेळापुरे चा प्रथम क्रमांक
पिलीव प्रतिनिधी/प्रमोद भैस
शिक्षण खात्याच्या शिक्षण विभागातर्फे दर वर्षी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही राष्ट्रीय स्तर स्पर्धा पार पडते.यंदाच्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२२ या ग्रॅन्ड फायनल स्पर्धेमधे क.भा.पा.विद्यालय पिलीव ची माजी विद्यार्थ्यीनी तसेच पिलीव ता.माळशिरस येथील रहिवासी कु.सुनयना विजय वेळापुरे हिने आपल्या संघासह प्रथम क्रमांक पटकावुन एक लाखाचे पारितोषिक जिंकले.भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर आणी हार्डवेअर अशा दोन स्वरुपात हि स्पर्धा होते.कु सुनयना वेळापुरे हीने या स्पर्धेमधे आपल्या टिम सोबत सहभाग घेतला होता.तिची निवड ग्रॅन्ड फायनल साठी झाली.'ई-वेस्ट मॅनेजमेंट' या थीमवर सुधारीत अशा एम.एस.डब्लु.एस या प्रणालीचे तिने सादरीकरण केले.या मिळालेल्या यशामुळे सुनयनाचे सर्वत्र कौतुका सह अभिनंदन केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा