शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा
अकलूज प्रतिनिधी
आज प्रशालेमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांची ज्ञानार्जनाची भूक भागवून त्यांना समृद्ध जीवन जगण्याची गुरुकिल्ली देणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सरस्वतीच्या फोटो पूजनाने झाली. फोटो पूजनानंतर
प्रशालेचे मुख्याध्यापक मा जितेंद्र माने देशमुख सर यांनी शिक्षकाची भूमिका आणि शिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प आणि पेन देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
काही विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त भाषणे केली. भाषणानंतर कीर्ती साठे आणि स्वरा कांबळे या दोघींनी भरतनाट्यम नृत्य प्रकारातून ईश्वर स्तवन सादर केले आणि मैत्री माळवदे हिने शिक्षिकेच्या भूमिकेतील सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांसाठी मनोरंजनपर चमचा लिंबूची शर्यत घेण्यात आली. त्यानंतर इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे कार्य केले. अशाप्रकारे कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले आणि कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु आर्या लावंड हिने केले तर आभार प्रदर्शन श्री गणेश शेवकर सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा