राष्ट्राची उभारणी शिक्षकच करू शकतात - सुरेंद्र गुदगे
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. शिक्षक दिना दिवशी ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे अशा शिक्षकांचा आदर सत्कार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शिक्षकच राष्ट्राची उभारणी करू शकतात असे मत मायणी शिक्षण भाग प्रसार मंडळाचे अध्यक्ष, मायणी अर्बन बँकेचे चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्रदादा गुदगे यांनी व्यक्त केले. खटाव पंचायत समितीमध्ये संदीपदादा मांडवे मित्र परिवाराच्यावतीने सत्काराचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ वैभव माने, ऊंबर्डेचे उपसरपंच संभाजीराव पवार, वडूज मेडिकल असोशियनचे माजी अध्यक्ष डॉ संतोष देशमुख, येरळा न्युजचे उपसंपादक शरदराव कदम, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी विभूते, युवा नेते रविंद्र खाडे, स्वप्नील घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडूज नंबर दोन व तीन या ठिकाणी कार्यरत असणारे आदर्श शिक्षक उमेश पाटील, नंदराज हाडस व येरळवाडीचे सरपंच योगेश जाधव यांच्या वाढदिवस सत्कार प्रसंगी ते बोलत होते. खटाव तालुक्याचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी शिक्षक हे समाजाला दिशा देण्याचे व मार्ग दाखवण्याचे पवित्र कार्य करत असतात, शिक्षक हे विद्यार्थ्यांना फक्त सुशिक्षित करत नसतात तर त्यांच्यावरती चांगले संस्कार करून उद्याची भावी पिढी ही संस्कारक्षम बनवण्याचं महत्त्वपूर्ण काम हे शिक्षकच करीत असतात त्यामुळे या शिक्षकांचा आदर सत्कार होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. तर श्री गुदगे पुढे म्हणाले उमेश पाटील हे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या मागणीनुसार शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नांसाठी आम्ही शिक्षकांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याचे अभिवचन सुरेंद्र गुदगे यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर आभार रविंद्र खाडे यांनी मानले. यावेळी सरपंच रमेश गंलडे, गजानन कुराडे, पत्रकार मुन्ना मुल्ला, नितीन राऊत, कालिदास फडतरे, प्रदिप यादव, रणजीत फडतरे, सोमनाथ साठे, सचिन साठे, मोहन माळी, दाऊद मुल्ला आदिसह मान्यवर उपस्थित होते.
फोटो -
वडूज - येथे उमेश पाटील, नंदराज हाडस, योगेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करताना सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, संभाजी पवार व मान्यवर
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा