*मराठी पत्रकार संघाच्या भिगवन अध्यक्षपदी प्रा तुषार क्षीरसागर [ सर ] तर सोशल मीडिया सेल अध्यक्ष पदी श्री सागर [आण्णा ] जगदाळे यांची निवड*
इंदापूर प्रतिनिधींनी विजय कुताळ
स्वातंत्र्यपूर्वकाळा पासून आज पर्यंत पत्रकारांनी समाजासाठी अविरत संघर्ष केलेला आहे आणि हा संघर्ष अजूनही चालू आहे. पत्रकारीता क्षेत्र काळानुसार बदलताना दिसत आहे. परंतु पत्रकार मात्र बदललेले दिसत नाहीत त्यांच आयुष्य स्थिर-स्थावर झाल्याचे दिसत नाही. पत्रकारीता म्हणजे ग्रामीण मातीवरील अन्यायाला फुटलेली वाचा होय,असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तानाजीराव काळे यांनी भिगवण पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारीणीच्या पदग्रहण प्रसंगी काढले.
येथील हॉटेल ज्योती व्हेज मधील सभागृहात भिगवण मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारीणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षदाची जबाबदारी तुषार क्षीरसागर यांनी स्वीकारली. तसेच सचिवपदी आप्पासाहेब गायकवाड यांची तर सोशल मिडीया सेलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सागर जगदाळे व सचिवपदाचा पदभार अरुण भोई यांनी स्विकारला.
पुढे बोलताना तानाजी काळे म्हणाले की, जो सजग, संवेदनाशिल आणि निरिक्षणक्षम असतो तोच खरा पत्रकार होय. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी बातम्या दडलेल्या असतात त्यासाठी केवळ दृष्टीकोन हवा. अगदी निसर्ग सुद्धा बातम्यांचा महत्त्वाचा स्त्रोत असू शकतो. पत्रकारांनी समाजाची चिकित्सा करतानाच समाजातील सकारात्मकतेला सुद्धा प्रसिद्धी द्यायला हवी.
यावेळी बोलताना पोलिस उपनिरिक्षक विनायक दडस पाटील यांनी सांगितले की, भिगवणचे पत्रकार अत्यंत सकारात्मक लेखन करतात.पत्रकार संघाने नव-पत्रकारांना दिशा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून पत्रकारांची लेखनी समाज आणि लोकशाहीच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन केले.
प्रसंगी पोलिस उपनिरिक्षक विनायक दडस पाटील, डॉ. प्रशांत चवरे, डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भिगवण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पिसाळ देशमुख, नारायण मोरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ सावंत यांनी केले. सुत्रसंचालन योगेश चव्हाण यांनी मानले तर आभार अरुण भोई यांनी मानले.
मराठी पत्रकार संघ कार्यकारीणी :
अध्यक्ष – तुषार क्षीरसागर, सचिव – आप्पासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष महेंद्र काळे व अतुल काळदाते, खजिनदार –आकाश पवार, कार्याध्यक्ष- सुरेंद शिरसट, समन्वयक – संतोष सोनवणे, जिल्हा प्रतिनिधी- नारायण मोरे.
मराठी पत्रकार संघ सोशल मिडीया सेल -
अध्यक्ष – सागर जगदाळे, उपाध्यक्ष – पल्लवी चांदगुडे, सचिव – अरुण भोई, कार्याध्यक्ष – गणेश जराड, खजिनदार – शैलेश परकाळे,
जिल्हा प्रतिनिधी – विजयकुमार गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा