दसरा मेळाव्यासाठी माढा तालुक्यातील हजारो शिवसैनिक जाणार - तालुकाप्रमुख मधुकर देशमुख
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच
टेंभुर्णी ( प्रतिनिधी) :- येत्या पाच तारखेला शिवसेनेचा भव्य असा दसरा मेळावा होणार आहे. शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, तेव्हा सर्व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मेळाव्यास माढा तालुक्यातून हजारापेक्षा जास्त शिवसैनिक जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख यांनी दिली आहे.
पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशा मेळावा होणार आहे. सदर मेळाव्याची टिझर सर्वत्र प्रकाशित झाले आहे. उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक जण आतुर झालेले आहेत. सदर मेळाव्यामध्ये उद्धव साहेब ठाकरे कोणती घोषणा करतात ठाकरे साहेब काय निर्णय घेतात, हे यातून स्पष्ट होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधव शिवतीर्थवर येण्याची ही परंपरा पहिल्यापासून आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होईल हे जाहीर झाले आहे. त्यामुळे सदर मेळाव्यासाठी तालुक्यातून अनेक जण येणार आहेत अशी माहिती तालुकाप्रमुख देशमुख यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा