कै.सुशिलाबाई पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित श्री. स्त्री शक्ती महिला मंडळ आयोजित नवरात्री निमित्त शारदेय नवरात्र महोत्सव
टेंभुर्णी प्रतिनिधी :- येथील ओम साई मंगल कार्यालय येथे ३० सप्टेंबर रोजी साजरा झाला. कार्यक्रम स्थळी श्री स्त्री शक्ती महिला मंडळाचे अध्यक्ष श्रीमती शीलाताई पाटील व मंडळाचे सदस्य जयश्रीताई येवले-पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.उपाध्यक्ष सुवर्णा भोसले, सचिव सविता जगताप मॅडम, खजिनदार वैशाली शिंदे उपस्थित होत्या. कुंकूमार्चन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर सर्व महिलांनी फेर धरून भोंडला देखील साजरा केला. पाककला स्पर्धेत भरपूर महिलांनी सहभाग घेतला. सर्वांनी सुंदर असे पदार्थ बनवून आणले होते त्यात स्वाती बाळासाहेब टोणपे हिचा प्रथम क्रमांक आला.शेवटी वेशभूषा करून दांडिया स्पर्धा घेण्यात आली ,त्यामध्ये महिलांनी सुंदर असे नृत्य सादर केले. दांडिया स्पर्धेत एंजल्स ग्रुप यांचा प्रथम क्रमांक आला.त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला . त्याचबरोबर सर्व महिलांसाठी कै. राजाबाई व्यंकटराव येवले-पाटील यांच्या स्मरणार्थ जयश्री येवले-पाटील यांच्याकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली,सर्व महिलांनी फराळाचा आस्वाद घेतला. तसेच मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमात सहभागी होऊन उत्साहाने व आनंदाने कार्यक्रम पार पाडला.
यावेळी श्री.स्त्री शक्ती महिला मंडळाचे सदस्य -जयश्रीताई येवले-पाटील, पल्लवी पाटील, सुषमा टकले, शीलाताई गायकवाड, सुनिता सोनवणे, सुप्रिया भोसले ,निशिगंधा मस्के, नंदा मोरे ,कुसुम फाळके, मनीषा येवले-पाटील ,अंजली अरगडे, कुसुम लोंढे, डॉ. स्मिता भोसले,कुसुम रेकटे ,हेमा चौधरी, आशा गुळवे, आश्लेषा येवले-पाटील, रूपाली येवले-पाटील, मनिषा भोसले ,भाग्यश्री पाटील, जयश्री तांबे ,अंजली कांबळे, प्रभावती यादव उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा