विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचा १५ वा गाळप हंगाम मोळी पुजन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी /धनंजय मोरे
विठ्ठल कार्पोरेशन , म्हैसगांव तालुका माढा येथील साखर कारखान्याच्या १५ वा गळीत हंगाम मोळी पुजन शुभारंभ कार्यक्रम आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला . सर्वप्रथम ऊस वजन काट्याची व वाहनांची पूजा करण्यात आली , नंतर आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीत हंगाम 22 - 23 चा शुभारंभ शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आला.
प्रारंभी केनयार्ड विभागातील सत्यनारायण काटा पुजन इंद्रजीत चोपडे व त्यांच्या पत्नी सुमन चोपडे यांच्या हस्ते करण्यात आली .
यावेळी कार्यकारी संचालक यशवंत शिंदे ,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार रणवरे , माजी आमदार विनायकराव पाटील , वामनराव उबाळे , डॉ. जयंत करंदीकर , प्रवीण पाटील , सुहास पाटील , माजी पंचायत समिती सदस्य विलास पाटील , हनुमंत पाडुळे , सुजित बागल , महादेव उबाळे , राजेंद्र बारकुंड , ॲड. जालिंदर बसळे , आप्पासाहेब उबाळे , सुरेश बागल , विजय पाटील , व्यंकटेश पाटील , बंडू भोसले , धनंजय मोरे, मधुकर पाटील , सर्जेराव बागल , पंडित खारे , सुरेश बागल , नगरसेवक आनंद टोणपे , संजय लोंढे , हर्षल बागल, लक्ष्मण राऊत , महेश गांधी , बाळासाहेब जगदाळे , सुशील गायकवाड ,सचिन लोंढे , दत्ता जगताप , किरण मोरे , कैलास माने , दत्ता भागवत , भारत लोखंडे , जालिंदर केदार आदी सभासद , शेतकरी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिलडा , टेक्स्टाईल विभागाचे जनरल मॅनेजर एस. ए. अंबी , चिफ केमिस्ट प्रदीप केदार , चीफ इंजिनियर मोहन पाटील , मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे , मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर , डिस्टिलरी मॅनेजर अनिल शेळके , शेती अधिकारी नामदेव रणपिसे , परचेस ऑफिसर कल्याण पाटील , प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा