सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांना राज्यपाल यांच्या हस्ते , राष्ट्रपती शौर्य पदक" ने सन्मानित.
प्रतिनिधी इंदापूर
शशिकांत सोनटक्के
इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तबगार शांत मनमिळावू स्वभावाचे तसेच शिस्तबद्ध कर्तव्यदक्ष अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना.दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गडचिरोली येथील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नागनाथ पाटील हे गडचिरोली येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांनी अनेक नक्षलवाद्यांना धोबीपछाड केले, त्यामुळे त्यांच्या उल्लेखनीय
कामगिरीबद्दल त्यांना लवकरच पोलिस खात्या अंतर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली.
नागनाथ पाटील यांचे मूळगाव उचठाण ता.मंगळवेढा जि . सोलापूर असून त्यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धात स्टेशन तसेच अंतर्गत बावडा चौकी मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
राष्ट्रपती पोलीस शौर्य पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा