Breaking

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

चेक बाउन्स प्रकरणी व्यापारी आरोपीस चार लाखाचा दंड व सहा महिने शिक्षा*- *अँड. श्रीनिवास कटकुर



*चेक बाउन्स प्रकरणी व्यापारी आरोपीस चार लाखाचा दंड व सहा महिने शिक्षा*- *अँड.  श्रीनिवास कटकुर*

सोलापूर 
आरोपी व्यापारी श्री.विकास सुभाष इंगळे वय 42 राहणार- अभिमानश्री कॉम्प्लेक्स,  मोरारजी पेठ ,सोलापूर या आरोपीस चेक बाउन्स प्रकरणी गुन्हा सिध्द झालेमुळे सदर केस मध्ये न्यायाधीश श्री. मनोज मोहोड साहेब   (प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सोलापूर )यांनी आरोपी व्यापारी विकास इंगळे यास दि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 कलम 138 नुसार या गुन्ह्याप्रकरणी दोषारोप व  गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी विकास  इंगळे यास चार लाखाचा आर्थिक  दंड व सहा महिने तुंरुगवासाची शिक्षा सुनावली.

 *यात केसची सविस्तर हकीकत अशी की*

 फिर्यादी अक्षय नगरी व 
साईप्रभा नगर रिअल इस्टेट चे प्रोप्रायटर. श्री राजू तुळशीदास अन्नम  वय -55 राहणार- जुना बिडी घरकुल, सोलापूर यांनी आरोपी व्यापारी मित्र श्री विकास सुभाष इंगळे वय -42 राहणार- मुरारजी पेठ ,सोलापूर यास जागा प्लॉट खरेदीसाठी रकमेची गरज असल्यामुळे व्यापारी इंगळे यास तीन लाखाची गरज असल्यामुळे फिर्यादी राजु अन्नम यांना आरोपीने  तीन लाखाची मदत मागितली व फिर्यादी राजु  अन्नम यांनी  मैत्रीचा विचार  करुन आरोपी विकास इंगळे यास  तीन लाख रुपये हातउसने सहा  महिन्यासाठी दिले होते व आरोपीने तीन लाख रुपये परतफेडी पोटी दिनांक 11 /3/ 2014 रोजीचा नीलकंठ सहकारी बँकेचा तीन लाख रुपये चा चेक नंबर 771031 हा चेक दिला व फिर्यादी राजु अन्नम  यांनी सदर तीन लाखाचा चेक बँकेत वटविण्यासाठी भरले  असता सदरचा  तीन लाखाचा चेक न वटता परत आला ,त्यामुळे फिर्यादु राजु अन्नम  यांनी आरोपी विकास इंगळे यांच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अँक्ट 1881 कलम 138 नुसार सोलापूर येथील मेहरबान. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात आरोपी विकास इंगळे यांचेविरुध्द फौजदारी खटला दाखल केला व सदरकामी यात फिर्यादी राजु अन्नम  तर्फे अँड. श्रीनीवास कटकुर यांनी न्यायालयात फिर्यादीस आरोपीने  दिलेला चेक व चेक रिटर्न बँक मेमो व  रक्कम मागणीची विधीज्ञ नोटीस व पोस्टाची पोचपावती आरोपीचे नोटिसीस उत्तर असे सर्व मुळ कागदपत्रे फिर्यादीच्या वतीने साक्षीपुरावा म्हणुन दाखल केले व सर्व कागदपञांची शहानिशा व लेखी व तोंडी पुरावा व साक्षीदारांचे जाबजबाब  ऐकुन मे.कोर्टात फिर्यादीचे  वतीने आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध करण्यात आला व आरोपीने जाणून-बुजून पिर्यादिस  न वटणारा खोटा चेक देऊन फसवणुक करुन  चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 कलम १३८ अन्वये आरोपीने केलेला  गुन्हा सिद्ध करण्पात आला व  फिर्यादीचे वतीने एडवोकेट. श्रीनिवास कटकुर यांनी न्यायालयात दाखल केलेले सर्व ओरिजनल कागदपत्रे ,चेक व रिटर्न मेमो व इतर पुरावे ,नोटीस व तसेच साक्षीदार फिर्यादीचा तोंडी व लेखी पुरावा व आरोपींने न वटणारा चेक देऊन कलम १३८ अंतर्गत आरोपीने केलेला गुन्हा एडवोकेट.श्रीनीवास कटकुर यांनी दाखल केलेला  साक्षपुरावा केलेला  युक्तिवाद ग्राहय धरुन मे.कोर्टात  आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध केला व त्यापुष्टयर्थ माननीय. सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवडे सुद्धा दाखल केला. व मे. कोर्टाने सर्व कागदपत्रे व तोंडी व लेखी साक्षी पुरावा पाहून अँड. श्रीनीवास कटकुर यांचा युक्तीवाद  ऐकून व  ग्राह्य धरून सोलापूर येथील मेहरबान. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमान. मनोज मोहोड यांनी आरोपी विकास सुभाष इंगळे वय 42 राहणार - मोरारजी पेठ, सोलापूर यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 255 (2) नुसार आरोपीस दोषी धरून कलम  138 नुसार आरोपीस चार लाख रुपयेचा आर्थिक दंड व सहा महिन्याची तुंरुग कारावासाची शिक्षा ठोठावली व चार लाख रुपये दंडातील रकमेपैकी फिर्यादी राजू अन्नम  यास  सीआरपीसी कलम 357 (3)  अंतर्गत चेक रक्कम तीन लाख रुपये  फिर्यादी राजू अन्नम  यांना अदा करणेचा आदेश करणेत आला.
*फिर्यादी राजु अन्नम यांच्या वतीने एस. के. लाॅ असोसिएटचे एडवोकेट.श्रीनिवास कटकुर एडवोकेट. किरण कटकुर ऍडव्होकेट .आकाश आयंची यांनी काम पाहिले तर आरोपीविकास इंगळे च्या वतीने एडवोकेट. सुरेश पाटील कुरुलकर यांनी काम पाहिले* व 
सदर निकालामुळे न वाटणारा चेक देणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा