Breaking

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

सावंत गट तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी




सावंत गट तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी 


करमाळा प्रतिनिधी 
आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सावंत गट तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले त्यावेळी उपस्थित सावंत गटाचे युवा नेते सुनील बापू सावंत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल आपले विचार व्यक्त केले सावंत आपल्या भाषणात बोलताना पुढे म्हणाले की आजच्या तरुण युवा पिढीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आचार विचार अंगीकारले पाहिजे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तरुण युवा वर्गाने व्यसनमुक्तीचा मार्ग स्वीकारावा असे ते आजच्या युवा पिढीला मार्गदर्शन करताना म्हणाले तसेच यावेळी मुस्लिम संघटनेचे नेते मैनुदिन बेग मुस्लिम यंग सर्कल चे अध्यक्ष साजिद बेग महिला आघाडीच्या चहा टपरी च्या अध्यक्ष झुंबरबाई मामी लेकुरवाळे
संभाजी गायकवाड विकास घोलप पप्पू रंधवे मंगेश शिरसाट राजेंद्र अंधारे भूषण सुरवसे आलिम शेख बंडू मुसळे अजय रंधवे संकेत नलवडे रवींद्र नलवडे आदि उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा