बेंबळे येथील प्रा.भक्तराज लोंढे यांना राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान...
बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे शानदार सोहळ्यात प्राध्यापक लोंढे यांचा सन्मान
फोटो
बेंबळे। प्रतिनिधी:
बेंबळे येथिल विमलेश्वर विद्यालयातील प्राध्यापक भक्तराज नारायण लोंढे यांना 'महात्मा फुले, सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. इतिहास अकादमी, राष्ट्र सेवा समूह आणि रयत प्रकाशन यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते पुणे येथे बालगंधर्व नाट्यगृहामध्ये या पुरस्काराने गौरविण्यात आले.
'महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले
यांच्या आदर्शावर निस्वार्थ वृत्तीने काम करून प्रा. भक्तराज लोंढे हे सुसंस्कृत पिढी तयार करत असल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान केल्याची माहिती महात्मा फुले इतिहास अकादमीचे अध्यक्ष श्रीमंत कोकाटे यांनी याप्रसंगी दिली.
यावेळी चित्रलेखा चे ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव, इतिहास तज्ञ डॉ श्रीमंत कोकाटे, राष्ट्र सेवा समूहा दलाचे प्रमुख राहुल पोकळे, टीसी कुंजीर, इतिहास अभ्यासक प्रा. सोमनाथ गोडसे, प्रा. औदुंबर लोंढे हे मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा