कन्हेरगांव साठी जलजीवन मिशन योजनेतून १ कोटी १८ लाखांचा निधी - आमदार संजयमामा शिंदे .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेतून माढा तालुक्यातील कन्हेरगांव साठी एक कोटी १८ लाख ७५९५० इतका निधी मिळाला असून , सदर कामाचे निविदाही काढण्यात आल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्याचा मार्ग सुलभ झाला असून कन्हेरगांव साठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून १ कोटी 18 लाखांचा निधी प्राप्त झाला असून या कामाची निविदाही निघाल्याने , लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त केले जात आहे.
करमाळा - माढा मतदारसंघातील जास्तीत जास्त गावांना जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मान्यता मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून , आतापर्यंत करमाळा तालुक्यातील 22 गावांसाठी 19 कोटी व माढा तालुक्यातील 36 गावातील बारा गावांसाठी सात कोटींची तरतूद केली असून राहिलेल्या गावासाठीही नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जास्तीत जास्त निधी आणून , ग्रामीण भागातील पाणी प्रश्न कायमचा सोडविणार असल्याचे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा