Breaking

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

श्रीराम विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी*


श्रीराम विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी*





*लातूर प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*

एरंडी - सारोळा ता. औसा येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयात सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री. अविनाश जाधव सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर इयत्ता सहावी च्या विध्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका श्रीमती. सुतार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित बालसभा सादर केली. या बालसभेला विध्यार्थ्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला. त्यानंतर श्री. काजळे सर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनतर इयत्ता पाचवी स्कॉलरशिप उत्तीर्ण विध्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने शाल, पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयातील  श्री. कदम सर, श्रीमती, सुतार मॅडम, साळुंके मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. शेवटी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. सूर्यवंशी सर यांनी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा