कुसमोड येथे प्रायोगीक तत्वावर ड्रोन दवारे गावठाण मधील भुमापन व सर्व्ह क्षण कार्यक्रमास प्रारंभ
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथे स्वामीत्तव योजनेअंतर्गत भुमीअभिलेख विभाग व माळशिरस पंचायत समिती व सर्व्हे आँफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कुसमोड येथे ड्रोन सर्व्हे क्षण कार्यक्रमाचा प्रायोगीक तत्वावर प्रारंभ माळशिरस तालुक्याचे गटविकास अधिकारी गूळवे ,तसेच भुमीअभीलेख अधिक्षक पाटील मॅडम ,सरपंच तुषार लवटे, उपसरपंच राणी पवार यांच्या सह अनेक मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कुसमोडचे ग्रामविकास अधिकारी नवले यांनी प्रास्ताविकामध्ये या योजनेनुसार गावातील मालमत्ता याचे अचुकपणे मोजमाप होणार आहे. गटविकास अधिकारी विजय गुळवे यांनी माळशिरस तालुक्यातील ५० गावांचे डो्नदवारे सर्व्हक्षण करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच यामुळे प्रत्येक नागरिकांची स्वतःच्या मालमत्तेचे अचुक मोजमाप होणार आहे यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेमुळे सर्व्हे न झालेल्या गावांचा डो्नदवारे सर्वे होणार आहे. गावातील मालमत्ता कर अदयावत करणे,गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार आहे, गावठाणातील खुली जागा,रस्त्याचा नकाशा तयार होणार आहे यामुळे गावातील वादविवाद मिटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर भुमीअभिलेख अधीक्षक पाटिल मॅडम यांनी यामुळे गावातील शासकीय जागा, खुल्या जागा,ओढे, नाले,घरे,रस्ते,यांचा डो्नदवारे सर्व्हे क्षण होऊन प्रत्येकाची मिळकत पत्रीका तयार होणार आहे. यामध्ये नागरिकांनी अधिकाऱ्यांना सर्व्हे क्षणासाठी मदत करावी .माळशिरस तालुक्यात प्रायोगीक तत्वावर आज याचा प्रारंभ केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. तसेच गावातील विशेषतः गावठाणातील वाद विवाद मिटण्यास मदत होणार आहे. तर अतिक्रमणाचा विषय संपणार आहे. यामध्ये नवीन नोंदी करता येणार नाहीत ग्रामपंचातीकडे रितसर नोंदी असणाऱ्याचा सर्व्हे केला जाणार आहे. फक्त वारस नोंदी अदयावत केल्या जाणार आहेत. कुसमोड गावात गावठाणातील १०७ मालमत्ता व शासकीय मालमत्तेचे सर्व्हे क्षण केले जाणार आहे. या कार्यक्रमास माजी सरपंच सिताराम धायगुडे, बचेरी चे सरपंच महादेव पाटील, शिंगोर्णीचे सरपंच अक्षय धांडोरे, मनोहर लवटे, ग्रामपंचायत सदस्य, महावीर धायगुडे, शहाजी लेंगरे, लक्ष्मण पवार, माजी उपसरपंच संजय पाटील,शहाजी वाघ,अज्ञान धायगुडे, शत्रुघ्न वाघ,सतीश व्होनमाने, देवा धायगुडे,,विविध गावातील ग्रामसेवक, तलाठी,शिक्षक, ग्रामस्थ यावेळी मोठय़ा संखेने उपस्थित होते. यावेळी उमाजी बोडरे व देवानंद चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामसेवक नवले यांनी उपस्थिथांचे आभार मानले .फोटो - कुसमोड येथे गावठाणातील मालमत्तेचे डो्नदवारे सर्व्हक्षण कार्यक्रमाचे प्रायोगीक तत्वावर प्रारंभ करताना माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुळवे साहेब,भुमीअभिलेख अधिक्षक पाटील मॅडम, सरपंच तुषार लवटे, व इतर मान्यवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा