फिनोलेक्स पाईप्स च्या सहकार्याने उभारली
माढा वेल्फेअर फाउंडेशनने अत्याधुनिक शेती प्रयोगशाळा.
आमदार बबनराव शिंदे , आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले उद्घाटन.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
माढा तालुक्यातील निमगांव टे येथे मुकुल माधव फौंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स यांच्या सहयोगाने आणि माढा वेल्फेअर फाउंडेशनच्या व कृषी विभाग सोलापूर यांच्या माध्यमातून अत्याधुनिक शेती प्रयोगशाळेचे उद्घाटन आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज चे सीईओ अजित वेंकटरमण यांच्या शुभहस्ते व पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
गुरुवारी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता निमगाव टें तालुका माढा येथील विठ्ठलगंगा फार्मस प्रोडुसर कंपनी च्या पटांगणात अत्याधुनिक तंत्रज्ञाने सुसज्ज अशा माती , पाणी , पान व देठ परीक्षण प्रयोगशाळेचे आमदार संजयमामा शिंदे , आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले .
यावेळी आमदार बबनराव शिंदे म्हणाले की , जमिनीची तपासणी केली पाहिजे त्यासाठी ही प्रयोगशाळा उपयोगी पडेल. फिनोलेक्स कंपनीच्या माध्यमातून माढा वेल्फेअर फाउंडेशनने सर्वात मोठा बेंद ओढा तयार केला. विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीने फिरती प्रयोगशाळा देणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले .
फिनोलेक्स कंपनीचे सीईओ अजित वेंकटरमण म्हणाले की , देशातील सर्वात मोठी चांगली अत्याधुनिक शेती प्रयोगशाळा , ही माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी तयार केली असून त्यांना पुढील काळातही सहकार्य करणार आहे.
पोलीस अधिक्षक शिरीष देशपांडे म्हणाले की , धनराज शिंदे यांचे कार्य बघून थक्क झालो .
या कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार , गुप्त वार्ता विभागाचे अधिकारी पाटील , माजी आमदार विनायकराव पाटील , गटविकास अधिकारी डॉ . संताजी पाटील , तहसीलदार राजेश चव्हाण , राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, फिनोलेक्स पाईप्स चे मुख्य विक्री अधिकारी विश्वजीत हरगुडे , विपणन अधिकारी संजय अळीकट्टे , टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर , मुकुल माधव फाउंडेशनचे बबलू मोकळे , विभाग प्रमुख डॉ. विनायक धुळप , माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर , जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील चांदसकर , तुकाराम ढवळे , निमगाव टें चे माजी सरपंच रविंद्र शिंदे आदी उपस्थित होते .
माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले की , जिल्यात सर्वात कमी दरात व ब्रेंडेड खतांची विक्री आम्ही करत असुन , सोलापूर हा सर्व फळांची निर्मिती करणारा जिल्हा आहे . जमिनीचा पोत तपासण्यासाठी मराठवाड्यापासुन ते एकमेव संस्था आहे.
कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले की , निमगाव परिसरात इतकं मोठं अत्याधुनिक युनिट तयार झाली , हे शेतकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे . शेतकऱ्यांसाठी एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत.
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे म्हणाले की , विकणं ही एक कला आहे , विषमुक्त अन्नधान्य उत्पादन करणे काळाची गरज आहे .
माजी आमदार विनायक पाटील , उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे युवराज शिंदे , रवींद्र शिंदे , पोपट खापरे , श्रीकांत पाटील , नितीन कापसे , नागनाथ शिंदे , महेश मारकड , राहुल वरपे , आनंद पाणबुडे , महेश डोके , सुजित भोसले यांनी स्वागत केले .
सुत्रसंचलन रविंद्र जाधव यांनी तर आभार नितीन कापसे यांनी मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा