महात्मा फुले विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयामध्ये दोन दिवस चालणारे स्नेहसंमेलनाचा आज समारोप झाला या स्नेह संमेलनामध्ये मराठी गाणी हिंदी गाणे मराठमोळी लावणी असे बहारदार कार्यक्रम संपन्न झाले.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनाचा शाळेमध्ये आनंद घेता आला नाही यावर्षी मात्र महात्मा फुले विद्यालयांमध्ये नोव्हेंबर महिन्या च्या पहिल्या आठवड्यामध्ये शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आनंद मुलांसह पालक वर्गाने घेतला स्नेह संमेलन पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केली दहा ते पंधरा दिवस परिश्रम घेतले. गेली पंधरा दिवस मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते कारण गेली दोन वर्ष शाळेमध्ये कुठलाही कार्यक्रम घेता आला नाही यावर्षी मात्र शाळेमध्ये सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये स्नेहसंमेलन असेल वार्षिक सहल असेल खो.खो, कबड्डी, अशा प्रकाराचे खेळ चालू वर्षांमध्ये घेण्यात येत आहेत.अंकुश भंडारे इयत्ता दहावीतील विद्यार्थी यांने इंदुरीकर महाराज यांचे हुबेहूब कीर्तन सादर करून उपस्थित मान्यवरांची व प्रेक्षकांची त्याने मने जिंकली.
स्नेहसंमेलनाचा दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून टेंभुर्णी गावचे सरपंच प्रमोद कुठे, इरा पब्लिक स्कूलचे संस्थापक महेंद्र वाकसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नवले, वेणेगावचे माजी सरपंच किरण कदम, बाळासाहेब ढगे, नागेश खटके ग्रामपंचायत सदस्य गणेशबापू केचे, युवा नेते संग्राम चव्हाण, माजी उपसरपंच भाऊसाहेब इंदलकर,महात्मा फुले विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष नारायण भानवसे, शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा