"मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेची बारामती तालुक्यात धडाकेबाज एन्ट्री.*
**संघटनेचा संविधान सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.*
प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के
संघटनेच्या बारामती तालुका पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
**पारवडी शाखेचे शानदार उद्घाटन.*
" मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेच्या वतीने बारामती तालुक्यातील पारवडी या गावात शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता संविधान सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. तसेच पारवडी शाखेचा ही शानदार उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी बारामती तालुक्यातील नुतन पदाधिका-यांचा सत्कार घेण्यात आला.
यावेळी प्रथम संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व इतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन तसेच संविधानाचे पुजन करून त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
संघटनेचे महाराष्ट्र सचिव अनिल केंगार यांनी प्रास्ताविक केले. तर मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे यांचे प्रमुख अध्यक्षीय भाषण झाले.
अतिशय उत्साहात हा संविधान सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे, संघटनेचे सचिव अनिल केंगार, संघटनेचे राजशिष्टाचार समितीचे भानुदास कदम, संपर्क प्रमुख नागेश भोसले, संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष अजय फले धीरज गडहीरे, प्रविण लोंढे, अक्षय फले, भैय्या खरात, प्रथमेश खरात, दत्तात्रय कांबळे, ऋतुज वनसाळे, इंदापूर महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता कांबळे,शिल्पा चव्हाण, कोमल वनसाळे हे उपस्थित होते.
तर बारामती चे नुतन तालुका अध्यक्ष धनंजय पाळेकर, शाखा अध्यक्ष सिध्दार्थ शिंदे महिला शाखा अध्यक्षा रुपाली पाळेकर, सोनाली भोसले, खजिनदार गणेश शिंदे, समता सैनिक दलाचे गौतम पाळेकर, संघटनेचे मिलिंद भोसले यांनी व स्थानिक कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा