Breaking

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाने पुन्हा एकदा कलाकारावर केला अन्याय*



*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाने पुन्हा एकदा कलाकारावर केला अन्याय*



 *वेस्ट झोन महोत्सवासाठी भल्या भल्या चा पत्ता कट फक्त मर्जीतल्या कलाकारांना संधी मिळाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा संताप*


*🙄🔥फक्त त्यांच्याच व्हॉट्स ॲप ग्रुप तयार*

टेंभुर्णी प्रतिनिधी

गतवर्षी पार पडलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इंद्रधनुष्य टीम मध्ये काही कलाकार ज्यांनी युवा महोत्सव मध्ये एकाही कला प्रकारात सहभाग नोंदवला नाही अशा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याचे विद्यार्थ्याकडून समजते व ज्या विद्यार्थ्यांचे पास झाले असताना प्रवेश न घेता त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संघामध्ये सहभागी केले आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण महिना आपल्या कलेला जपत अथक परिश्रम करून आपल्या महाविद्यालयाला बक्षीस मिळवून दिली अशा विद्यार्थ्यांना या शिबिरांपासून दूर ठेवल्याने विद्यार्थ्याकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 सर्वसाधारणपणे ज्या विद्यार्थ्यांनी जीव ओतून आपले सादरीकरण केले अशा सर्व विद्यार्थ्यांवरती सोलापूर विद्यापीठ सोलापूर ने कोणती ही परवानगी न देता कोणतेही पत्रांना पाठवता आपल्या जवळ आणि सानिध्यातील विद्यार्थ्यांना या संघामध्ये सहभागी करून घेतले आणि सर्वसामान्य कलाकारावरती अन्याय केलेला आहे तसेच गतवर्षी होणारा  वेस्ट झोन शिबिराची ही कोणतीही पूर्व कल्पना न देता व कोणत्याही प्रकारची निवड चाचणी न घेता वेस्ट झोन टीम तयार करून आपल्या मर्जीतील व जवळच्या विद्यार्थ्यांना  घेऊन पुनर्च एकदा विद्यापीठाने सर्वसामान्य ग्रामीण भागातील कलाकारावरती आणि विद्यार्थी वर अन्याय  केला असल्याचे विद्यार्थ्यांमधून चर्चा आहे. 
याचं उत्तर विद्यापीठाने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना द्यावा. विद्यापीठात प्रशिक्षक सुद्धा मर्जीतले च घेतले जातात. सूत्राकडून कळते ज्यांचा आजपर्यंत रिझल्ट आहे असे वगळले जातात आणि यात सुद्धा जात आडवी येते.
हे असच चालू राहील तर राष्ट्रीय स्तरावर सांघिक कलाप्रकार जाणार कसे.जे चारित्रहीन कलाकार आहेत यांच्या सांगण्यावर हा प्रकार चालतो.पूर्वीची शिबिर शिस्तप्रिय ,संस्कार शिल ,आणि रिझल्ट देणारी असायची पण 2016 पासून याचा मात्र खेळ खंडोबा झालेला आहे आणि आता 2021 पासून विचारायची सोयच नाही.मुळात नवीन कलाकारांना संधी द्यायला हवी 5 वर्ष कॉलेज बदलून नापास झाल्यावर दुसऱ्या फॅकल्टी ला प्रवेश घेणारी अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली मर्जीतले पुन्हा पुन्हा घेऊन संघाची सध्या नासाडी सुरू आहे. अनुभवी घ्यावा पण ज्याच्यात कलाकरीच नाही असे घेऊन सोलापूर पुढं जाणार कस याच संचालक आणि कुलगुरूंनी विचारमंथन करावं अन्यथा विभागाला छावणी च स्वरूप आणायला चांगल्या कलाकरण वेळ लागणार नाही अशी तीव्र व प्रतिक्रिया सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा