Breaking

शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

100 टन प्लस ऊस उत्पादन शेतकरी मंच" च्या वतीने शिवार फेरीचे आयोजनःःःः विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम..


"100 टन प्लस ऊस उत्पादन शेतकरी मंच" च्या वतीने शिवार फेरीचे आयोजनःःःः
 विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम..


 बेंबळे। प्रतिनिधी                        

                      विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व 'ऊस उद्दिष्ट शंभर टन प्लस शेतकरी मंच' यांच्यावतीने काही प्रमुख गावातून शिवार फेरी व आदर्श प्लॉट पाहण्याचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे व बबनराव शिंदे शुगर/ केवड चे प्रमुख रंणजीत भैय्या शिंदे यांच्या प्रेरणेतून 100 टन प्लस ऊस उत्पादन घेतलेल्या व 100 टन उत्पादन टारगेट ठेवलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांचे प्लॉट पाहण्यासाठी शिवार- फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

          या शिवार फेरीमध्ये निमगाव टे. येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे केन मॅनेजर संभाजी थीटे यांनी शेतकऱ्यांना शेणखत, कंपोस्ट खत व राख याची भट्टी लावून शेतामध्ये तयार होणारे कंपोस्ट खत कसे वापरावे व हुमणी या उसाच्या मुळावर पडणाऱ्या रोगावर  कसे नियंत्रण मिळवावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.परिते येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सुनील बंडगर यांनी शेतकऱ्यांना प्रति एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी जमिनीची निवड, माती परीक्षण, दोन सऱ्यातील अंतर, बेण्याची निवड ,पाणी नियोजन, ठिबक सिंचन व रासायनिक तसेच इतर खतांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी परिते येथील प्रगतिशील शेतकरी भारत कोंडीबा बाबर यांनी या हंगामात प्रति एकरी को- 265 व्हरायटीचे 120 टन ऊस उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते   सत्कार करण्यात आला. याशिवाय या शिवार फेरीदरम्यान प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी, गांडूळ खत प्रकल्प राबविणारे शेतकरी, सुपर केन नर्सरी करणारे शेतकऱी अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची विशेष व्यक्ती म्हणून म्हणून निवड करण्यात आली. बेंबळे येथील कृषी भूषण पुरस्कार प्राप्त ऊस बागायतदार सोमनाथ भास्कर हुलगे यांच्या 125 टन टारगेट उत्पादन उसाच्या प्लॉटची पाहणी करून शिवार फेरी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
        या कार्यक्रमांमध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त बागायतदार सोमनाथ हुलगे, साखर कारखान्याचे ॲग्री ओव्हरसीयर, चीट बॉय व इतर कर्मचारी यांचे सहीत अनेक शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा