*रामनाथ मध्ये शालेय विभागीय ज्युदो स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा सत्कार संपन्न.*
*लातूर प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
आलमला :- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , आलमला ता. औसा या विद्यालयातील 17 विद्यार्थ्यांची नांदेड येथील क्रीडा संकुलात संपन्न झालेल्या शालेय विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यापैकी पुढील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयांमध्ये दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आला. त्यात 23 किलो वजन गटात कु. गीता राठोड प्रथम, 32 किलो वजन गटात कु. पवार वैष्णवी प्रथम, 36 किलो वजन गटात कु. कदम साक्षी प्रथम, 32 किलो वजन गटात कु. कदम समृद्धी द्वितीय, 40 किलो वजन गटात कु. चव्हाण काजल द्वितीय, 44 किलो वजन गटात कु. आडे ममता द्वितीय, 50 किलो वजन गटात कु. पवार पूजा तृतीय, तसेच 40 किलो वजन गटातून मुलामधून लोणारे सुमित द्वितीय, व 38 किलो वजन गटात बोकडे साधू हा द्वितीय आला.सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक श्री. आंबुलगे आर. एस. व श्री बिराजदार एल. पी. यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांचे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पाटील अनिता, पर्यवेक्षक श्री. पाटील पी. सी. व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा