श्री शारदेय गुरुकुल स्कुलची कराटे स्पर्धेत बाजी.
श्री लक्ष्मणराव देशमुख ( गुरुजी ) बहुउद्देशीय सार्वजनिक संस्था संचलित श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलमधील खेळाडूंनी सध्या चालू असलेल्या माढा तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेमध्ये लक्षणीय यश संपादन केले आहे .
नुकत्याच काल झालेल्या तालुकास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रशालेने इयत्ता आठवीतील कुमारी सृष्टी संतोष वाघ व इयत्ता दहावीतील विद्यार्थी कुमार अमित हसन शेख यांना प्रशालेकडून प्रतिनिधित्व करत कराटे स्पर्धेत सहभागी होण्यास पाठवले होते.
खेळाडूंनी प्रशालेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करत या झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये 66 किलो वजनी गटांमध्ये कुमार अमित हसन शेख याने प्रथम क्रमांक मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले तसेच कुमारी सृष्टी संतोष वाघ हीनेही ५५ किलो वजनी गटांमध्ये बाजी मारत तृतीय क्रमांक पटकावला . खेळाडूंच्या विजयाची बातमी समजताच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक यांनी खेळाडूंचे कौतुक केले तसेच क्रीडाशिक्षक श्री तानाजी ढुके सर यांचेही अभिनंदन केले व पुढील येणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रशाले तर्फे आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा