कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प्रोएकटीव्ह अबकस नॅशनल कॅमपीटीशन परीक्षेत स्मित प्रोएकटीव्ह अबकसच्या विदयार्थीचे दैदिप्यमान यश
पिलीव प्रतिनिधी/ प्रमोद भैस-
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील स्मित प्रोएकटीव्ह अबकस च्या विद्यार्थीनी कोल्हापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्य स्तरीय पातळीवर 2022- 23 मध घेण्यात आलेल्या परीक्षेत पिलीवच्या विद्यार्थीनी दैदिप्यमान यश संपादन केले यामध्ये झिरो लेवल कटगरीत हर्ष सुहास कोल्हे याने 450 विदयार्थीत प्रथम क्रमांक मिळविला, तर अभिराज गणेश देशमुख याने दुसरा क्रमांक, वेणु गोपाल श्रीकांत आर्वे याने चौथा क्रमांक मिळविला, लेवल एकमध्ये 560 विदयार्थयात आयुष गणेश देशमुख हयाने तिसरा क्रमांक मिळविला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना 4 ट्रॉफी व 4 सुवर्णपदके देऊन गौरविण्यात आले.हया स्पर्धेत 6 मिनीटात 100 गणीते सोडविणे .कमीत कमी वेळेत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करीत आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये आरुष अतुल आर्वे, कृष्णप्रीत आर्वे, सार्थक देशमुख, शुभम पवार हया विद्यार्थीना सुवर्णपदक मिळाले तसेच हया सर्व विद्यार्थ्यांनची फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या प्रोएकटीव्ह अबकस नॅशनल कामपीटीशन साठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय फाळके सर,शरद जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विदयार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो - पिलीव येथील स्मित प्रोएकटीव्ह अबकस चे सुवर्णपदक विजेते विद्यार्थी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा