Breaking

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत सहाव्या दहा दिवसाचे ऊस बील ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग-


विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत सहाव्या दहा  दिवसाचे ऊस बील ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग-


टेंभुर्णी/प्रतिनिधी 
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून या गळीत हंगामात गाळपास आलेल्या सहाव्या दहा दिवसाचे प्रति टन 2350 रूपये प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता बील सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे  यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2022-23 चा गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. युनिट नं.1 पिंपळनेर येथे आजअखेर 8 लाख 27 हजार 369 मे.टन व युनिट नं.2 करकंब येथे  आजअखेर 2 लाख 51 हजार 086 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामात दोन्ही युनिटकडे दि.11/12/2022 ते 20/12/2022 या सहाव्या 10 दिवसाचे कालावधीत गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन रू.2350/-प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यासाठी कारखान्याने 39 कोटी 4 लाख रूपये ऊस पुरवठादारांचे बँक खात्यावर वर्ग केले आहेत.

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व इतर अधिकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा