*संभाजी ब्रिगेड च्या वतीने तुळजापूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन*
प्रतिनिधी/ रुपेश डोलारे धाराशिव
भारतीय जनता पार्टीचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अशोभनीय वक्तव्य करुन समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अन्यथा संभाजी ब्रिगेड त्यांना समजेल त्या भाषेत उत्तर देईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल असतील अथवा प्रसाद लाड असतील अथवा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते त्रीवेदी असतील अथवा रावसाहेब दानवे असतील हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करुन समस्त शिवप्रेमींना भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आपणांस विनंती आहे की या समाज विघातक लोकांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.यावेळी
संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री शरद पवार साहेब,संभाजी ब्रिगेड जिल्हासचिव आक्षय नरवडे,
संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्ष शिवश्री महादेव मगर,संभाजी ब्रिगेड तालुका सचिन,
शिवश्री संभाजी जाधव,
संभाजी ब्रिगेड शिवश्री संजय, बनसोडे.यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा