Breaking

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसैनिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोप काढो आंदोलन**उपोषणाची दखल न घेणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारसह प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी*



*प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसैनिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोप काढो आंदोलन*


*उपोषणाची दखल न घेणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारसह प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी*


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


उस्मानाबाद -
ठाकरे सरकारच्या काळात उस्मानाबाद नगर परिषदेला विविध योजनांंमधून दिलेल्या 30 कोटी रुपयांच्या कामांना राजकीय सूडबुुद्धीने स्थगिती देऊन विकासाला आडकाठी आणणार्‍या शिंदे-फडणवीस सरकार, पालकमंत्री आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी रविवारी (दि.25) शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोप काढो आंदोलन करुन मागणीकडे लक्ष वेधले. सोमनाथ गुरव, पंकज पाटील, रवी वाघमारे, अजय नाईकवाडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाची पाचव्या दिवशीही दखल न घेतल्यामुुळे  हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील, मा.नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झोप काढून शिंदे-फडणवीस सरकार, पालकमंत्री आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर सकाळी सकाळीच दणाणून गेला.

झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग यावी आणि शिवसेनेच्या उपोषणाची दखल घेऊन विकासकामांना दिलेली स्थगिती उठविण्याची सद्बुद्धी शिंदे-फडणवीस सरकार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाला मिळावी, तसेच उपोषणाला पाठींबा म्हणून याकरिता आम्ही हे आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आंदोलनात ठाकरे सेनेचे भारत इंगळे, संजय मुंडे, बाळासाहेब काकडे, दत्ता बंडगर, राणा बनसोडे, बंडू आदरकर, नेताजी राठोड, भीमा जाधव, हनुमंत यादव, प्रशांत बोदर, सुमित बागल, राहुल भांडवले, बाळासाहेब पोतदार, अजित बाकले, किशोर लगदिवे, प्रशांत जगताप, राकेश सूर्यवंशी, सत्यजित पडवळ, रोहन गव्हाणे, मुजीब काझी, अफरोज पिरजादे, सुनील जाधव, तानाजी पतंगे, विकी जाधव, अनिल राठोड, साबेर सय्यद,  पिंटू आंबेकर, पंकज पडवळ, विनोद केजकर, मनोज पडवळ, प्रसाद राजे, चेतन वाटवडे, नाना घाडगे,  पिंटू पवार, मंगेश काटे, शुभम लावंड, सर्फराज मोमीन, किरण बोचरे, सुधीर अलकुंटे, रोहन गव्हाणे, विशाल जगताप, नवनाथ वाघमारे यांच्यासह शहरातील विविध भागातील नागरिक उत्स्फूर्तपणे  सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा