स्वर्गीय कृष्णात बोबडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्त स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा व टेंभुर्णी भूषण पुरस्काराचे आज वितरण.
AJ 24Taas News प्रतिनिधी धनंजय मोरे
स्वर्गीय कृष्णात बोबडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनाच्या निमित्ताने समाजकारणातील एक राजहंस.. वकील साहेब या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा तसेच ' टेंभुर्णी भूषण ' पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी दहा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी दिली.
या कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , खासदार रणजितसिंह निंबाळकर , आमदार बबनराव शिंदे , आमदार संजयमामा शिंदे , भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार विजयकुमार देशमुख , आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , आमदार सुभाष देशमुख , विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील , शिवसेनेचे माढा लोकसभा प्रमुख संजय कोकाटे , माजी मंत्री सदाभाऊ खोत , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे , माजी आमदार धनाजीराव साठे , माजी आमदार विनायकराव पाटील , शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत ,दादासाहेब जामगावकर , माजी सभापती शिवाजीराजे कांबळे , संजय पाटील भिमानगरकर , रयत क्रांती संघटनेचे सुहास पाटील , भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भारतनाना पाटील , जलतज्ञ अनिल पाटील , टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर , नातेपुते डॉ . एम.पी . मोरे , रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव , पुणे येथील उद्योजक सतीश साठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
टेंभुर्णी भूषण पुरस्काराचे मानकरी व्यवसाय - बाळासाहेब लक्ष्मण देशमुख , सामाजिक - शीलाताई भारत पाटील , व्यापार - शशिकला विजयकुमार व्होरा , उद्योग - दीपक नामदेव मोहिते , क्रीडा - रोहिदास सुरेश वाघमारे यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा