बबनरावजी शिंदे विद्यालयात ७४वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कन्हेरगाव(प्रतिनिधी)
दि .२६ जानेवारी रोजी अकोले ( खुर्द ) येथील मा .बबनरावजी शिंदे माध्य . व कला , वाणिज्य विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव (टें ) या संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र अभिमान ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बिभीषण महाराज चिंतामण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माढा तालुका राष्ट्रवादी कार्यअध्यक्ष अनिलदादा तोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन भारताची व महाराष्ट्राची संस्कृती दर्शनात्मक व क्षेपनास्त्रसज्जता परेड प्रभातफेरी करुन प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेत विद्यार्थ्यांचे मल्लखांब कसरतीची प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. क्रीडा शिक्षक विजय कुमार माने,श्रीराम सर . बिराजदार सर, सदाशिव पाटील सर,मिस्किन सर यांनी मार्गदर्शन केले .
प्रभातफेरीमध्ये देशाची राजधानी दिल्ली येथे इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन सैन्य व शस्त्रास्त्र सामर्थ्य प्रदर्शन परेड केली जाते त्याचीच प्रतिकृती प्रशालेत प्रत्येक प्रजासत्ताक दिनी परेड केली जाते . विज्ञान शिक्षक व विज्ञान कृतिशील आदर्श शिक्षक संभाजी अनपट सर, तसेच विलास पवार सर यांनी मॉडेल नं . PS LV सॅटेलाईट लाँचिंग विद्यार्थ्यांसमवेत तयार करून प्रभातफेरीमध्ये सर्वात पुढे व त्याबरोबर वैज्ञानिक व अंतराळवीर याप्रमाणे विद्यार्थ्यांची रचना केली . तसेच स .रा. मोरे विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका मधुरा सुरवसे मॅडम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींची भारतमातेची वेशभूषा करुन जिप्सीमध्ये तिरंगा झेंड्यासह मिरवणूक काढली व पाठोपाठ भारतीय त्या पाठोपाठ प्रशालेतील प्रत्येक इयत्तेतील वर्गशिक्षक व शिक्षकांनी भारताची व महाराष्ट्राची संस्कृती दर्शनात्मक देशातील राज्यांची वेशभूषा परिधान करणारे विद्यार्थी तयार केले . महाराष्ट्राची संस्कृती दर्शनासाठी वारकरी दिंडी , थोर पुरुष जिजाऊ , शिवराय , संभाजी महाराज ,थोर नेते , क्रांतीकारक , टिपरी नृत्य , कोळीगीते , सिध्देश्वर यात्रा , झांजपथक,लेझीम , मूकनाट्य , पथनाट्य, क्रीडा व शिष्यवृत्ती क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी यासह तिरंगा प्रदर्शनही विद्यालयाच्या सुमारे २५०० विद्यार्थ्यांना समवेत प्रभातफेरी संपन्न केली .
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर अकोले ( खु . )गावच्या सरपंच रुपालीताई कांतिलाल नवले , कांतिलाल नवले,सोसायटीचे चेअरमन हरिआप्पा पाटील, माजी सरपंच महादेव घाडगे भाऊसाहेब , माजी सरपंच किसन माऊली घाडगे ,नानासाहेब नवले, विनोद पाटील सर, सचिन बबनराव पाटील, माजी उपसरपंच कुबेरभाऊ महाडिक , बिभीषण महाडिक , हरिभाऊ गोरे , सुनिल आप्पा नवले, सुधाकर नवले , बाबासाहेब कुटे ,अशोकआबा पाटील , कृष्णराज नवले , गणेश भांगे ,तानाजी जगताप, अनंत कवळस, अंबादासराव करडिले , गणेश कुटे, सागर महाडिक आदी मान्यवरांसह प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते .
करमाळ्याचे आमदार तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयमामा विठ्ठलरावजी शिंदे यांच्या प्रेरणेतून व संस्थेचे सचिव तथा प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र अभिमान ठोंबरे सर यांच्या संकल्पना व कृतीतून प्रशालेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर विविध नावीण्यपर्ण उपक्रमातून भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन संस्थेचे संचालक तथा विज्ञान कृतिशीलआदर्श शिक्षक श्री संभाजी अनपट यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी कोळी सर यांनी तर दिनेश डोके सर यांनी मानले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा