Breaking

मंगळवार, ३ जानेवारी, २०२३

विमलेश्वर विद्यालयाच्या प्राचार्य पदी स्वाती पाटील- भोसले यांची नियुक्ती...



विमलेश्वर विद्यालयाच्या प्राचार्य पदी स्वाती पाटील- भोसले यांची नियुक्ती...


बेंबळे/ प्रतिनिधी                       
              येथील श्री विमलेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक /प्राचार्य पदावर स्वाती भारत पाटील- भोसले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, प्राचार्य अशोक श्रीरंग बागवाले हे आपल्या 32 वर्षाच्या  प्रदीर्घ सेवेनंतर 31 डिसेंबर 22रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचे जागी स्वाती पाटील-भोसले यांनी 1जानेवारी23 रोजी प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला आहे. शिक्षण संस्थेच्या मागील 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला प्राचार्य म्हणून स्वाती भोसले यांना मान मीळाला आहे. सौ स्वाती  पाटील-भोसले या एम ए बी एड असून 2007 पासून या ठिकाणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विमलेश्वर विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत 642 विद्यार्थी असून एकूण 20 शिक्षक आहेत .या विद्यालयाचे संस्थापक कार्यवाह व बेंबळे गावचे माजी सरपंच गोविंद भोसले यांच्या स्वाती पाटील या सुनबाई आहेत. या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील उत्कृष्ट आदर्श शिक्षक रणजीत डिसले, भोसे येथील प्राध्यापक तुकाराम मस्के व इतर अनेक मान्यवरांनी नूतन प्राचार्य स्वाती पाटील भोसले यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. याप्रसंगी नूतन प्राचार्य स्वाती पाटील भोसले यांचा  अनेक मान्यवरांकडून सत्कार देखील करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा