Breaking

गुरुवार, २६ जानेवारी, २०२३

मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या प्रसिद्धीप्रमुख पदी बालाजी सिरसाट यांची निवड


मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या प्रसिद्धीप्रमुख पदी बालाजी सिरसाट यांची निवड


नांदेड जिल्हा प्रतिनिधी

नांदेड : शहरातील नवा मोंढा येथील मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याला गेल्या तीस वर्षाची विशेष परंपरा आहे. विविध कार्यक्रम व वैचारिक प्रबोधनाने हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींचा उपस्थित जन समुदाय,महिला रॅली,ढोलपथक,शिवकालीन मर्दानी खेळ,शिवविवाह,लेझीम पथक अशा भरगच्च कार्यक्रमाचा समावेश असलेल्या मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट यांची निवड करण्यात आल्याची घोषणा शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भगवानराव कदम व स्वागत अध्यक्ष सुभाषराव कोल्हे यांनी जाहीर केले.

शिवजन्मोत्सव प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल बालाजी पाटील सिरसाट यांचे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा