Breaking

रविवार, २२ जानेवारी, २०२३

शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी भगवान कदम तर स्वागताध्यक्षपदी सुभाष कोल्हे यांची निवड



शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी भगवान कदम तर स्वागताध्यक्षपदी सुभाष कोल्हे यांची निवड

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छञपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव नांदेड शहरात मोठ्या हर्षोउल्हासात साजरा होणार असून त्या समितीच्या अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम अध्यक्ष तर स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

       मराठा सेवा संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यकारिणी निवडी संदर्भात अत्यंत महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वस्तीग्रह नांदेड येथे संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंजि शे रा पाटील उपस्थित होते.मराठा सेवा संघ कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोपानराव क्षीरसागर,मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक शिवाजीराव खुडे, पंडीत पवळे,शिक्षक परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी पाटील बामणीकर, जिजाऊ ब्रिगेड च्या भारती मढवई, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील,मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर,मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष उद्धव सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अरुणा जाधव आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात छञपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी गेल्या पंचवीस-तीस वर्षापासून वैचारिकरित्या करणारी एकमेव मराठा सेवा संघ संघटना राहिलेली आहे.या उत्सवात महिलांचा युवकांचा हजारोने सहभाग असतो.शिवजन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैचारिक मेजवानी सह हर्षोउल्हासात साजरा करूयात तसेच जन्मोत्सवासाठीचा निधी मराठा सेवा संघाच्या खात्यावरच गतवर्षी प्रमाणे जमा करुन पारदर्शकता आणुयात असे मत बैठकीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंजि शे रा पाटील  यांनी मांडले. मराठा सेवा संघ व ३२ कक्ष आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांची तर स्वागताध्यक्षपदी  संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सतीश जाधव, पि.के.कदम, प्रेमकुमार कौशल्ये,संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्षपदी श्रीनिवास शेजुळे, नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कपाळे,न्याय कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील,दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप गुबरे,दीपक भरकड,कमलेश कदम, संगमेश्वर लांडगे,अविनाश पाटील,संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष सतीश धुमाळ,मोहन शिंदे,संतोष धामदरीकर,पंडीत धामदरीकर, अंकुश कोल्हे सचिन कदम, नितीन कोकाटे,व्यंकट कदम,बालाजी देशमुख,दशरथ कदम, गजानन इंगोले यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचलन दशरथ कदम यांनी तर आभार गजानन इंगोले यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा