Breaking

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

जेऊर येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी उद्या सोलापूर येथील रेल्वे प्रशासकीय कार्यालयात बैठकीचे आयोजन



जेऊर येथे रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी उद्या सोलापूर येथील रेल्वे प्रशासकीय कार्यालयात बैठकीचे आयोजन



करमाळा प्रतिनिधी 
 करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्थानकावर हुतात्मा इंटरसिटी व पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना जेऊर येथे थांबा मिळावा या प्रमुख मागणीसाठी उद्या 12/01/2023 रोजी DRM ऑफिस सोलापूर येथे मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री श्यामसुंदर मानधना साहेब यांच्या नेतृत्वाखाली  सोलापूर येथील रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व जेऊर येथील प्रवासी संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक आयोजित केली आहे
 

 12157-58 हुतात्मा इंटरसिटी व  पुणे  -  कन्याकुमारी या गाड्यांना जेऊर स्थानकावर  तातडीने थांबा देण्यात यावा,. तिकीट खिडकी शेजारी दुसरा फूट ओव्हर ब्रीज बसवण्यात यावा,. प्लॅटफॉर्म क्रमांक 1. व 2. वर 700.स्क्वेअर मीटर निवारा शेड बसविण्यात यावेत., या प्रमुख मागणीसाठी उद्या बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती जेऊर येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास सूर्यवंशी यांनी दिली

जेऊर येथे रेल्वे स्टेशनवर हुतात्मा इंटरसिटी तसेच पुणे कन्याकुमारी एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी गेली कित्येक महिन्यापासून जेऊर येथील रेल्वे प्रवासी संघटना तसेच व्यापारी वर्ग याशिवाय जेऊर ग्रामस्थ रेल्वे रेल्वे शासन दरबारी प्रयत्न करीत आहे मात्र रेल्वे प्रशासनाने जेऊरकरांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे केम या ठिकाणी सुपरफास्ट रेल्वे ना थांबा मिळतो तर जेऊर येथे का मिळत नाही व आमच्यावर असा दुजाभाव का असा प्रश्न जेऊरकर सध्यातरी करीत आहे तेव्हा दिनांक 12 जानेवारीच्या होऊ पाहणाऱ्या रेल्वे प्रशासन व जेऊर येथील व्यापारी वर्गाच्या बैठकीमध्ये कोणता तोडगा निघतो याकडे जेऊरकरांचे लक्ष वेधले आहे

चौकट घ्या
खासदार साहेब आमच्या जेऊर रेल्वे स्थानकावर हुतात्मा इंटरसिटी व पुणे कन्याकुमारी या दोन्ही रेल्वे गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न करावा साहेब आज आम्ही गेली कित्येक महिन्यापासून रेल्वे प्रशासनाच्या दारी वाऱ्या करीत आहोत मात्र आमच्या कागदो पत्राला अक्षरशा केराची टोपली दाखवली जाते हा आमच्यावर अन्याय नव्हे का तेव्हा खासदार साहेब करमाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या जेऊर येथे आपण जातीने लक्ष देऊन उपरोक्त दोन्ही रेल्वे गाड्यांसाठी विशेषतः थांबा देण्यासाठी आपण प्रयत्न करावे ही नम्र विनंती



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा