खैरव -मानेगाव उपसा सिंचनाचा श्रेयवाद
**********************दादा जे केलं ते मीच केलं हे ठीक आहे परंतु जे आम्ही करतोय ते पण मीच केल ही भूमिका बरोबर नाही.... योगेश बोबडे
टेंभुर्णी प्रतिनिधी/AJ24Taas News Maharashtra साठी प्रतिनिधी गणेश चौगुले
***********************************
सध्या माढा येथील दिवाणी न्यायालयाचा प्रश्न असो खैराव मानेगाव उपसा सिंचन योजना असो तालुक्यातील रस्त्यांचा निधी तालुक्यातील विविध कामांच्या बाबतीत मंत्रालयात होणाऱ्या बैठका आणि त्या बैठकांमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या कामांना निधी येऊ लागला हा प्रश्न विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यामार्फत योगेश बोबडे तालुक्यातील विकास कामांचे निवेदन देऊन डायरेक्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना भेटून प्रत्यक्ष मंजुरी घेणे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक लावणे यासारखी कामे आम्ही करत असताना.. इथेच तालुक्याच्या नेतृत्वाची राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांची गोची होऊ लागली असल्याचे मत आमच्या AJ 24Taas News प्रतिनिधीशी बोलताना बोबडे यांनी व्यक्त केले असुन त्यामुळे तालुक्यातील विविध विकास कामांच्या श्रेय वादाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात गाजत असून जे केलं ते आम्हीच केलं आणि जे राहिलं तेही आम्हीच करणार याला कुठेतरी छेद मिळताना पाहायला मिळत असल्याचे खंत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ जानेवारी रोजी या कामासंदर्भात बैठक लावली होती. परंतु, त्या अगोदरच आमदार बबनदादा शिंदे यांनी स्वत: मंजुरीसाठी प्रयत्न केल्याचे सांगून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी केला आहे.
बोबडे म्हणाले की, मानेगाव येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी मानेगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी मानेगाव खैराव उपसा सिंचन योजना सुरू व्हावी, यासाठी निवेदन दिले होते. त्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितली असता त्या संदर्भात उद्या, २४ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित खात्याची मिटिंग लावलेली होती. परंतु त्या अगोदरच आपल्या तालुक्याचे आमदार शिंदे यांनी सदर योजनेला तत्वतः अंतिम मान्यता मिळाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केल्या आहेत.
होणाऱ्या मिटींगची माहिती
मिळाल्यानंतर नेहमीप्रमाणे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा प्रयत्न आहे. जर खरच सदर योजनेस तत्वतः मान्यता मिळाली असेल तर त्याचा पुरावा बातम्यांबरोबर सादर करायला पाहिजे होता.
आमदार शिंदे यांना माझी विनंती आहे की, आपण खरंच पाठपुरावा करून खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेस तत्वतः मान्यता मिळविली असेल तर त्याचा पुरावा सोशल मीडियावरती द्यावा. उगीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटून स्वतःची प्रसिद्धी करू नये, अशी मागणी भाजपचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा