*तुळजापूर नगर परिषद मधील कंत्राटी सफाई कामगार योगेश रणदिवे यांच्या आमरण उपोषण ला भिम-अण्णा सामाजिक संघटनेचा पाठिंबा*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापुर नगर परिषद येथे "समृदधी फॅसिलीटी पूणे"या कंपनी मार्फत तुळजापूर येथील ६० कर्मचारी यांना गेल्या वर्षीपासून नियुक्ती केली आहे.परंतू अचानक त्यांना लेखी नोटीस न देता कामावरून कमी केलेले आहे.त्यामुळे त्या कामगारांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे ते रस्त्यावर येवून आमरण उपोषणास बसले आहेत.
सदरील कंपनी तुळजापूर नगर परिषद यांचे मार्फत काम करित असल्याने सदर बेकायदेशीर घटनेला दोघेही म्हणजे नगरपरिषद व समृद्धी फॅसिलिटी कंपनी पूर्ण हेच जबाबदार आहेत.सदरचे उपोषण हे कामगारांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी संविधानाच्या तत्वाला अनुसरून केलेले असल्याने भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन त्यांच्या आंदोलनात संघटना सदैव त्यांच्या सोबत राहील असे आश्वासन दे्ण्यात आले.यावेळी तालुका अध्यक्ष राम कांबळे ,भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक सल्लागार समिती प्रमुख तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक(भाऊ) जाधव,दत्ता (भाऊ)कांबळे,जयराज क्षिरसागर,विकास भिसे,विशाल शेंडगे ,रवि गायकवाड ,सिध्दीकी ईनामदार ,प्रमोद डोलारे,करण पाडागळे,आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा