Breaking

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

सुनेस पाच लाखाची हुंडा मागणी प्रकरणी पती व सासरच्या लोकांविरुद्ध फौजदारी खटल्यात न्यायालयाचे प्रोसेस इशूचा हुकूम*



*सुनेस  पाच लाखाची  हुंडा मागणी प्रकरणी पती व  सासरच्या लोकांविरुद्ध फौजदारी खटल्यात न्यायालयाचे प्रोसेस इशूचा हुकूम*


सोलापूर- 
 गणेश पेठ येथील राहणारे श्री. प्रणव कोटा वय 28 व त्यांचे वडील, आई आणि इतर लोकांविरुध्द  भारतीय दंड विधानसंहिता कलम 498(अ),  323 ,504, 506 व 34 या कलमांतर्गत सुनेस पाच लाखाची रोख  हुंडा व पाच तोळे सोने मागितल्या प्रकरणी  आरोपींविरुद्ध आयपीसी 498 अ,323 ,504, 506 , 34  कलमा अंतर्गत मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री.वराडे साहेब कोर्टाने आरोपी विरूध्द प्रोसेस इश्युचा आदेश  केलेला आहे .
*यात केसचे सविस्तर हकीकत अशी की* 
नेहा हिचा विवाह प्रणव  कोटा यांच्याशी दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी सोलापूर येथे विवाह संपन्न झाला .सदर विवाह संबंधातून दांपत्याला कोणताही आपत्य जन्मलेले नाही आणि लग्नानंतर सहा महिन्यानंतर पती व सासरकडील मंडळी हे नेहमी सुनेस माहेरुन पाच लाख रुपये हुंडा प्लॉट विकत घेण्यासाठी घेऊन ये , म्हणून तिचा नेहमी मानसिक , शारिरीक ,आर्थिक अत्याचार व छळ व  जाचहाट करत होते व  या सर्व प्रकाराला कंटाळून माहेरील लोकांकडून सुद्धा अनेकदा पंच बैठक बसून मध्यस्थीचा प्रयत्न झाला, तरीसुद्धा पती व सासरकडील मंडळींचा स्वभाव  बदलला नाही आणि त्यामुळे शेवटी सासरकडील मंडळींनी सुनेचा छळ व  मारहाण  करून 5 जानेवारी  2021 रोजी माहेरी हाकलुन  दिले ,तेव्हापासून सुन नेहा  ही माहेरीच राहत होती आणि शेवटी अँड.  श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मे. मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये भारतीय दंड विधानंसहिता  कलम 498 अ,   323, 504, 506 व 34 या कलमांतर्गत पती प्रणव  कोटा,  सासरे -रामदास कोटा , सासू- वंदना कोटा व  नणंद सुवर्णा सर्व राहणार  गणेश पेठ  सोलापूर यांच्याविरुद्ध



 सोलापूर येथील मे. न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला व या कामी मेहरबान. कोर्टाने नेहा यांचा जबाब घेऊन व वकिलांचा युक्तिवाद ऐकून  सर्व आरोपीविरुध्द वरील  कलमांतर्गत खटला दाखल करुन घेवुन   प्रोसेस इशूचा हुकुम  आरोपींना केला व पुढील तारखेपर्यंत मे. कोर्टात हजर राहणेचा हुकुम केला. 
*यात पिडीत सुनेतर्फे अँड.  श्रीनीवास  कटकुर,  अँड.  किरण कटकुर, अँड. आकाश आयंची  हे  काम पाहत आहेत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा