Breaking

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

विठ्ठलराव शिंदे कारखान्यास देश पातळीवरील उच्चांकी गाळपाचा पुरस्कार प्रदान



विठ्ठलराव शिंदे कारखान्यास देश पातळीवरील  उच्चांकी गाळपाचा पुरस्कार प्रदान


दिलीप लव्हटे यांना उत्कृष्ठ फायनान्स मॅनेजर व संतोष गव्हाणे यांना उत्कृष्ठ पर्यावरण अधिकारी व सौ.दिपाली हुलगे यांना ऊस भूषण पुरस्कार प्रदान-


बेंबळे।प्रतिनिधी।  AJ 24Taas news                   

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेकडून सन 2021-22 गळीत हंगामात केलेल्या उच्चांकी ऊस गाळपासाठीचा देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे येथे प्रदान करण्यात आला.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली या संस्थेकडून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना  लि.युनिट नं.1 पिंपळनेर येथील कारखान्याची सन 2021-22 गळीत हंगामातील उच्चांकी गाळपासाठी प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड झालेली होती. या जाहीर पुरस्काराचा वितरण समारंभ 21 जानेवारी 2023 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे येथे संपन्न झाला. सदर पुरस्कार वितरण समारंभामध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यास उच्चांकी ऊस गाळपाचा पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील व माजी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे या मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने  सन 2021-22 गळीत हंगामामध्ये उच्चांकी 24 लाख 78 हजार 922 मे.टन ऊसाचे  गाळप केलेले आहे.

तसेच सदरप्रसंगी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेकडून सन 2021-22 साठी विठ्ठलराव शिंदे  सहकारी साखर कारखान्याचे  फायनान्स मॅनेजर दिलीप दगडू लव्हटे यांना उत्कृष्ठ फायनान्स मॅनेजर व पर्यावरण अधिकारी संतोष विठ्ठलराव गव्हाणे यांना उत्कृष्ठ पर्यावरण अधिकारी हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे ऊस पुरवठादार सौ.दिपाली सोमनाथ हुलगे रा.बेंबळे यांना सन 2021-22 या गळीत हंगामात पूर्वहंगामात प्रति हेक्टर 340.87 टन ऊसाचे मध्य विभागात विक्रमी ऊस उत्पादन घेतल्याने त्यांना ऊस भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

सदर प्रसंगी कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे,व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,संचालक पोपट गायकवाड,सुरेश बागल,शिवाजी डोके,वेताळ जाधव,लक्ष्मण खुपसे,प्रभाकर कुटे, रमेश येवलेपाटील, संदीप पाटील,सचिन देशमुख,लाला मोरे,पांडूरंग घाडगे,पोपट चव्हाण, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, जनरल मॅनेजर एस.आर.यादव, जनरल मॅनेजर प्रोसेस पी.एस.येलपले,केन मॅनेजर एस.पी.थिटे, फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे, पर्यावरण अधिकारी एस.व्ही.गव्हाणे, सौ.दिपाली हुलगे व सोमनाथ हुलगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

नॅशनल फेडरेशन,नवी दिल्ली या संस्थेकडून विठ्ठलराव शिंदे कारखान्यास विक्रमी ऊस  गाळप, उत्तम आर्थिक व्यवस्थापन,उच्चांकी साखर निर्यातीसाठी पुरस्कार प्राप्त झालेले  आहेत. या कारखान्यास आजअखेर देश व राज्य पातळीवरील 22 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा