Breaking

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

फेब्रुवारी अखेर गाळप हंगाम चालणार- आ.बबनराव शिंदे31 जानेवारी अखेर ऊस बील जमा



फेब्रुवारी अखेर गाळप हंगाम चालणार- आ.बबनराव शिंदे
31 जानेवारी अखेर ऊस बील जमा


बेंबळे।प्रतीनीधी.....        फोटो. आ.शिंदे

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून या गळीत हंगामात गाळपास आलेल्या 31 जानेवारी अखेर पर्यंत प्रति टन 2350 रूपये प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता बील सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे  यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की,  विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून युनिट नं.1 पिंपळनेर येथे आजअखेर 13 लाख 70 हजार 237 मे.टन व युनिट नं.2 करकंब येथे  आजअखेर 4 लाख 19 हजार 952 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर 17 लाख 90 हजार 189 मे.टन ऊसाचे  गाळप झालेले आहे. युनिट नं.1 पिंपळनेर हा जिल्ह्यात गाळपात आघाडीवर आहे. तसेच या गळीत हंगामात दोन्ही युनिटकडे दि.21/01/2023 ते 31/01/2023 या अकराव्या 10 दिवसाचे कालावधीत गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन रू.2350/-प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यासाठी कारखान्याने 41कोटी 21 लाख रूपये ऊस पुरवठादारांचे बँक खात्यावर वर्ग केले आहेत.

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन्ही युनिटचा सन 2022-23 गाळप हंगाम फेब्रुवारी अखेर पर्यत चालणे अपेक्षीत  असून कारखान्याकडे नोंदलेल्या  संपूर्ण ऊसाचे गाळप वेळेत होणार आहे. तरी सर्व सभासद,ऊस पुरवठादार शेतक-यांनी त्यांचा ऊस  विठ्ठलराव शिंदे कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे  आवाहन संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे  यांनी केले.

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व इतर अधिकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा