Breaking

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

लोकनेते स्व. कृष्णात दादा बोबडे यांच्या स्मरणार्थ यशस्वी महिला मंचच्या वतीने टेंभुर्णी मध्ये महाराजस्व अभियानाचे आयोजन.


लोकनेते स्व. कृष्णात दादा बोबडे यांच्या स्मरणार्थ यशस्वी महिला मंचच्या वतीने टेंभुर्णी मध्ये महाराजस्व अभियानाचे आयोजन.


टेंभुर्णी ता. माढा येथे शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी लोकनेते कृष्णात दादा बोबडे यांच्या स्मरणार्थ यशस्विनी महिला मंचच्या वतीने शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महाराजस्व अभियानचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर करमाळा रोड, टेंभुर्णी येथील सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये सकाळी ८.00 पासून सायं ६.०० पर्यंत आयोजित करण्यात आलेले असून यामध्ये ज्या लोकांचे नवीन मतदान कार्ड नोंदणी, नवीन आधार कार्ड नोंदणी, नवीन रेशन कार्ड किंवा विभक्त रेशन कार्ड, श्रावण बाळ योजना प्रकरण तयार करणे,  हेल्थ कार्ड काढणे, दुबार रेशन कार्ड काढणे, संजय गांधी निराधार योजना प्रकरण करणे, ई-श्रम कार्ड काढणे, रेशन कार्ड मध्ये नवीन नाव वाढवणे, आयुष्यमान भारत कार्ड काढणे तसेच महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे परंतु त्यांना रेशनचा माल मिळत नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्यानंतर मान मिळण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच रेशन कार्ड हरवल्यानंतर पोलीस स्टेशनचा गहाळ झालेला दाखला घ्यावा लागतो त्याचीही व्यवस्था या शिबिरात करण्यात आलेली आहे. तलाठी कार्यालय, माढा तहसील कार्यालय या ठिकाणी हेलपाटे मारून देखील ज्यांची कामे लवकर होत नाहीत त्या सर्वांसाठी दिनांक 17 रोजी एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे टेंभुर्णी शहरातील नागरिकांना वरील सर्व सेवा एकाच ठिकाणी आणि एकाच दिवसात मिळतील त्यामुळे वरील योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
 संपर्कासाठी फोन नंबर उमेश ताबे - 9881233311 गोवर्धन नेवसे - 8390613030  सुरजा बोबडे - 9970781009

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा