सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन कार्यक्रमांची आवश्यकता - गणेश करे -पाटील .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व आपली ग्रामीण संस्कृती व महाराष्ट्राची परंपरा जोपासण्यासाठी स्नेहसंमेलना सारख्या कार्यक्रमांची नितांत गरज आहे , यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम होते असे प्रतिपादन यशकल्याणी समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे - पाटील यांनी केले.
वडशिवणे तालुका करमाळा येथील अजितदादा पवार विद्यालय येथे शुक्रवारी 24 फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश करे - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते . प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शिवछत्रपती युवक संघटना केम सचिव मारुती पारखे होते . प्रारंभी मुख्याध्यापक भिमराव भोसले यांनी प्रास्ताविकात शाळेच्या गुणवत्तेचा अहवाल देत सर्वांचे स्वागत केले.
यावेळी कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साई देवकर , माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पारखे , सरपंच अमोल जगदाळे , सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार , चेअरमन विलास बिचीतकर, बाळासाहेब म्हेत्रे, आनंद शिंदे, सागर दौंड, उपसरपंच अमोल उघडे, माजी सरपंच हिरा , केमचे मुख्याध्यापक महादेव देवकर , विठ्ठलराव शिंदे प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल लोंढे , नागेश मोरे ,सोसायटी चेअरमन महारुद्र बाबर, सुभाष पवार , बाळासाहेब वनवे, आबा कदम, रत्नाकर कदम, सातोलीचे उपसरपंच खूपसे , सखाराम राऊत, मधुकर गाडे, संतोष आंबेकर, बाळू लावंड, महादेव अंधारे, शिवाजी पारखे, सचिन व्हरे, सागर पवार, राहुल उघडे, बापू वनवे, पैलवान विकास पारखे, महादेव भागवत, सुनील कोरे , महारुद्र पवार,, नवनाथ शेळके, संतोष सावंत, दादा वाघमारे, पप्पू देवकर उपस्थित होते .
यशा कल्याणी सेवा संस्थेतर्फे विद्यालयाला चार अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही देण्याची घोषणा केली.
या विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी गणेश वंदना , महाराष्ट्र गीत , गोंधळ गीत , लावणी , शिवराज्याभिषेक सोहळा , इंदुरीकर यांचे कॉमेडी कीर्तन इत्यादी विविध विषयाला हात घातला .
सूत्रसंचालन नागेश मोरे व धनंजय खंडाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश कोरे यांनी केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा